Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार काँग्रेसची 3 मतं फोडणार, महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, सूत्रांची माहिती

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. अजित पवार काँग्रेसची 3 मतं फोडणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे उद्या काय-काय घडामोडी घडतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अजित पवार काँग्रेसची 3 मतं फोडणार, महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, सूत्रांची माहिती
अजित पवार
Follow us
| Updated on: Jul 11, 2024 | 8:01 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापताना दिसत आहेत. राज्यातील 4 पक्षांनी आपल्या आमदारांना मुंबईतील 4 वेगवेगळ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवलं आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग किंवा कुठल्याही प्रकारचा दगाफटका होऊ नये यासाठी ही काळजी घेतली जात आहे. असं असलं तरी काँग्रेस पक्ष निश्चिंत आहे. कारण काँग्रेसचा एक उमेदवार सहज जिंकून येणार आहे. काँग्रेसची उर्वरित मते महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जाणार आहे. पण महाविकास आघाडीच्या याच मतांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पक्ष भगदाड पाडण्याची शक्यता आहे. कारण सूत्रांकडून याबाबत मोठी बातमी मिळत आहे. अजित पवार काँग्रेसची 3 मते फोडणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे किमान 3 मतं फोडणार, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अजित पवारांना दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी 5 मतांची आवश्यकता आहे. अजित पवार यांच्याकडे सध्या 2 अपक्ष आमदारांची मते आहेत. पण तरीही त्यांना आणखी 3 मतांची आवश्यकता असणार आहे. त्यामुळे ते काँग्रेसचे 3 मतं फोडणार, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

‘या सगळ्या अफवा’, जयंत पाटील यांचा दावा

दरम्यान, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या वृत्तावर प्रतिक्रिया दिली. “या अशा सगळ्या अफवा असतात. काँग्रेस आमदार वळले असतील तर ते कळेलच की कोण-कोण वळलं आहे. ते दडून राहत नाही. त्यामुळे त्या वळलेल्या आमदारांचा काँग्रेस विचार नक्कीच करेलच”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिलं.

आमचे तीन-चार मतं फुटणार, आमदाराचं मोठं वक्तव्य

दुसरीकडे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. विधान परिषद निवडणुकीत आमचे तीन-चार मतं फुटणार असल्याचं मोठं वक्तव्य कैलास गोरंट्याल यांनी केलं आहे.”विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत आम्हाला माहिती आहे की, आमचे तीन-चार लोकं हे फुटणार आहेत. त्यानुसार आम्ही आमची रणनीती आखलेली आहे. आम्हाला माहिती आहे की, आमच्या उमेदवाराला कोणताही दगाफटका होणार नाही याची खबरदारी आम्ही घेतलेली आहे. महाविकास आघाडीबद्दल आज ठरवणार आहोत. आमचे जे दोन-तीन लोकं आहेत, कुणाचा बाप राष्ट्रवादीत गेला, कुणाचा नवरा राष्ट्रवादीत आहे, एक टोपीवाला कधी इकडे असतो तर कधी तिकडे असतो. तर एक नांदेडवाला आहे. या चारही जणांचं कसं करायचं ते आम्ही ठरवणार आहोत. आम्हाला जे चार दिसत आहेत त्यांचे कान कसे टोचायचे ते आज रात्री ठरणार आहे आणि सर्व रणनीती आखणार आहोत”, असं कैलास गोरंट्याल म्हणाले आहेत.

'एक बार मैंने जो...', डायलॉगबाजीनं शिंदेंनी मानले कोकणवासियांचे आभार
'एक बार मैंने जो...', डायलॉगबाजीनं शिंदेंनी मानले कोकणवासियांचे आभार.
'मी बोललो तर ठाकरेंना देश सोडावं लागेल', रामदास कदम भरसभेत कडाडले
'मी बोललो तर ठाकरेंना देश सोडावं लागेल', रामदास कदम भरसभेत कडाडले.
'...तर धसच जबाबदार', संतोष देशमुख प्रकरणावरून जरांगे पाटलांचा हल्लाबोल
'...तर धसच जबाबदार', संतोष देशमुख प्रकरणावरून जरांगे पाटलांचा हल्लाबोल.
ठाकरेंच्या या 3 नेत्यांची हाकालपट्टी, शिंदेंचा 'धनुष्यबाण' हाती घेणार?
ठाकरेंच्या या 3 नेत्यांची हाकालपट्टी, शिंदेंचा 'धनुष्यबाण' हाती घेणार?.
'आपले कार्यकर्ते नुसते थुंकले तरी ते वाहून जातील', दानवेंची जीभ घसरली
'आपले कार्यकर्ते नुसते थुंकले तरी ते वाहून जातील', दानवेंची जीभ घसरली.
'मला हात लावला तर उडी घेईन', 'म्हाडा' मुख्यालयात महिलेने उधळल्या नोटा
'मला हात लावला तर उडी घेईन', 'म्हाडा' मुख्यालयात महिलेने उधळल्या नोटा.
उदय सामंतांचा तो धंदाच, ते कोणत्याही थराला जाऊ शकतात, कोणाचा हल्लाबोल?
उदय सामंतांचा तो धंदाच, ते कोणत्याही थराला जाऊ शकतात, कोणाचा हल्लाबोल?.
भास्कर जाधवांकडून खंत व्यक्त; म्हणाले, 'क्षमतेप्रमाणे मला काम...'
भास्कर जाधवांकडून खंत व्यक्त; म्हणाले, 'क्षमतेप्रमाणे मला काम...'.
शनिशिंगणापूरच्या शनिला ब्रँडेड तेलाने अभिषेक, देवस्थानाचा निर्णय काय?
शनिशिंगणापूरच्या शनिला ब्रँडेड तेलाने अभिषेक, देवस्थानाचा निर्णय काय?.
ममता कुलकर्णींचा यूटर्न, 'किन्नर'च्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा मागे
ममता कुलकर्णींचा यूटर्न, 'किन्नर'च्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा मागे.