NCP Sharad Pawar : शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

| Updated on: Apr 15, 2021 | 12:21 PM

Sharad Pawar discharged : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना आज ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्या आला आहे.

NCP Sharad Pawar : शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवारांचा फोटो सुप्रिया सुळेंनी शेअर केला
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) यांना आज ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून (Breach Candy Hospital) डिस्चार्ज देण्यात आला आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ही माहिती दिली.

शरद पवार यांना  11 एप्रिल रोजी  ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 12 एप्रिल रोजी त्यांच्या पित्ताशयावर लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात आली. दोन दिवस हॉस्पिटलमध्ये विश्रांती घेतल्यानंतर आज शरद पवार यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची तब्येत बरी आहे. देशभरातील जनतेने, चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या. शिवाय दिलेल्या पाठिंब्याबद्दल नवाब मलिक यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

शरद पवारांवर शस्त्रक्रिया 

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार  यांच्या पित्ताशयावर तीन दिवसापूर्वी 12 एप्रिलनंतर यशस्वीपणे पार पडली.  या शस्त्रक्रियेनंतर शरद पवार (Sharad Pawar) यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असल्याची माहिती नवाब मलिक यांनी त्यावेळी दिली होती. शरद पवार हे 11 एप्रिलला ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी प्रतिभा पवार आणि मुलगी खासदार सुप्रिया सुळे होत्या.

सुप्रिया सुळेंची दुहेरी भूमिका

एकीकडे शरद पवारांचं आजारपण आणि दुसरीकडे पंढरपूर विधानसभेची प्रतिष्ठेची पोटनिवडणूक अशा दुहेरी पेचात सापडलेल्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी वेळ पडल्यास एखादी स्त्री किती मल्टीटास्किंग होऊ शकते, याचा प्रत्यय आणून दिला. त्यांनी बुधवारी एक मुलगी आणि पक्षाची एक कार्यकर्ता या दोन्ही भूमिका अगदी चोखपणे पार पाडल्या. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या आजारपणामुळे सुप्रिया सुळे यांना पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात प्रत्यक्ष फिरून प्रचार करता आला नव्हता. मात्र, बुधवारी त्यांनी ब्रीच कँडी रुग्णालयाबाहेरुनच व्हर्च्युअल सभा घेत पंढरपूरच्या मतदारांशी संवाद साधला.

संबंधित बातम्या  

Sharad Pawar: शरद पवार यांच्या पित्ताशयावरील लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया यशस्वी; प्रकृती स्थिर      

शरद पवार रुग्णालयात, सुप्रिया सुळेंचं ‘ब्रीच कँडी’च्या गेटवरुन भाषण, पंढरपूर पोटनिवडणुकीची सभा गाजवली