खासदारांचे 12 कोटी मोदींनी परस्पर कापले, सुप्रिया सुळे म्हणाल्या, निर्मलाताई, अर्थखातं अजितदादाकडून शिका!

खासदारांचे 12 कोटी मोदी सरकारने परस्पर कापल्यावरुन सुप्रिया सुळे बोलत होत्या. (Supriya Sule Nirmala Sitharaman Ajit Pawar)

खासदारांचे 12 कोटी मोदींनी परस्पर कापले, सुप्रिया सुळे म्हणाल्या, निर्मलाताई, अर्थखातं अजितदादाकडून शिका!
निर्मला सीतारमण, सुप्रिया सुळे, अजित पवार
Follow us
| Updated on: Feb 11, 2021 | 4:31 PM

नवी दिल्ली : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भर संसदेत महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि बंधू अजित पवार (Ajit Pawar) यांचा दाखला दिला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांना अजित पवारांकडून मार्गदर्शन घेण्याचा सल्लाही सुप्रिया सुळेंनी दिला. खासदारांचे 12 कोटी मोदी सरकारने परस्पर कापल्यावरुन सुप्रिया सुळे बोलत होत्या. (NCP MP Supriya Sule suggests FM Nirmala Sitharaman to learn from Ajit Pawar)

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

“मला एक गोष्ट तुमच्या निदर्शनास आणायची आहे. केंद्रीय आणि महाराष्ट्र कॅबिनेटच्या अर्थमंत्र्यांमध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. केंद्रीय अर्थमंत्री (निर्मला सीतारमण) यांनी देशातील प्रत्येक खासदाराकडून बारा कोटी रुपये काढून घेतले, तेही त्यांना न विचारता. त्यांनी परस्पर घेऊन टाकले. आता लोक आम्हाला विचारतात, एमपीलॅड फंड द्या, ते तर मोदीजी घेऊन गेले. कुठून देऊ, अडीच वर्ष तर काहीच करता येणार नाही.” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

“जीएसटी येत नसतानाही चांगली व्यवस्था”

“याच्या अगदी उलट, एकाही आमदाराकडून… चारही पक्षांच्या बरं का, हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक आमदाराला, अगदी विरोधीपक्षातीलही आमदारालाही दरवर्षी पाच कोटी रुपये मिळतील, हे आमच्या अर्थमंत्र्यांनी सुनिश्चित केलं. हा भारताचे अर्थमंत्री आणि महाराष्ट्राचे अर्थमंत्री यांच्यातील फरक आहे. दोन कोटीही दिले आणि नंतर तीन कोटीही दिले. कुठलीही कपात करण्यात आलेली नाही. जीएसटी येत नसतानाही राज्य सरकारकडून चांगली व्यवस्था केली जात आहे.” याकडे सुप्रिया सुळेंनी लक्ष वेधलं.

“मला वाटतं, तुम्ही महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून काहीतरी शिकू शकता. त्यांच्याकडून थोडं मार्गदर्शन घेता येईल. लोकांकडून चांगल्या कल्पना घेणं, ही चांगली गोष्ट असते.” असं सुप्रिया सुळे संसदेत म्हणाल्या.

पाहा व्हिडीओ :

मोदी सरकारच्या यूटर्नचा पाढा

“भाजपने जीएसटी, मनरेगा आणि आधार यूआयडीसारख्या योजनांना सुरुवातीला आक्रमक विरोध करुन नंतर स्वतःच या योजना राबवल्या होत्या. हा यूटर्न नव्हता का?” असा सवालही सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत उपस्थित केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना शरद पवार यांचा नामोल्लेख केला होता. नव्या कृषी कायद्यांच्या धोरणांना पवार यांचा सुरुवातीला पाठिंबा होता, असं मोदी म्हणाले होते. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत मोदी सरकारच्या यू-टर्नचा पाढाच वाचला. (NCP MP Supriya Sule suggests FM Nirmala Sitharaman to learn from Ajit Pawar)

‘मी पंतप्रधानांचे भाषण सुरु असताना या मुद्यावर प्रतिवाद करु शकले असते. पण आमची ती संस्कृती नाही. त्यामुळे मी आता त्याला उत्तर देत आहे’, असं सांगत मोदी सरकारच्या निर्णयामाघारीवर बोट ठेवलं.

भाजपच्या भूमिकेवर टीकास्त्र

“शरद पवार यांनी जे पत्र राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिले होते, त्यात त्यांनी कृषी कायद्याच्या बदलांबाबत राज्यांना केवळ प्रस्ताव दिला होता आणि पूर्ण अभ्यास करुनच राज्यांनी त्यावर विचार करावा’, असे म्हटले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी जीएसटी करप्रणालीला विरोध केला होता. यूपीए सरकारनं आरटीआय, अन्न सुरक्षा कायदा, शिक्षणाचा हक्क, नरेगा, नवीन कॉर्पोरेट कायदा, जमीन अधिग्रहण कायदा आणला होता. विकासाच्या कोणत्याही कायद्याला युपीएने एकतर्फी न आणता सर्वांशी चर्चा करुन विकासाचे कायदे आणले. भाजपने सुरुवातीला या कायद्यांना विरोध करुन सत्तेत आल्यानंतर याच कायद्यांची अंमलबजावणी केली”, अशा शब्दात सुळे यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला.

संबंधित बातम्या :

राज्यसभेत पवारांचा दाखला, मोदी म्हणाले ना खेळणार, ना खेळू देणार, मी तर खेळ बिघडवणार!

बाचाबाचीत पंतप्रधान मोदी संतापले; म्हणाले, अधीर रंजनजी आता जरा जास्तच होतंय

मोदी सरकारचा हा लेफ्ट टर्न, राईट टर्न आहे की यु-टर्न?, पवारांवरील मोदींच्या टीकेला सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर

(NCP MP Supriya Sule suggests FM Nirmala Sitharaman to learn from Ajit Pawar)

Non Stop LIVE Update
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?.
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव.
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला.