AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही संधीचा योग्य फायदा उठवलात; अमृता वहिनींच्या गाण्यावर रोहित पवारांची टिप्पणी

काही लोकांना सहज तर काहींना प्रयत्न करूनही संधी मिळत नाही. | Amruta Fadnavis

तुम्ही संधीचा योग्य फायदा उठवलात; अमृता वहिनींच्या गाण्यावर रोहित पवारांची टिप्पणी
हे गाणे ऐकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे.
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Mar 09, 2021 | 11:37 AM
Share

मुंबई: महिला दिनाच्या मुहूर्तावर अमृता फडणवीस यांचे नवे गाणे प्रदर्शित झाले होते. हे गाणे ऐकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे. अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी त्यांना मिळालेल्या संधीचा योग्य फायदा उठवला, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. (Amruta Fadnavis new song kuni mhanale released)

काही लोकांना सहज तर काहींना प्रयत्न करूनही संधी मिळत नाही. ज्यांना सहज संधी मिळते ते या संधीचा योग्य वापर करतातच असं नाही, पण अमृताताईंनी मिळालेल्या संधीचा आपण गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो. अशीच आवड जोपासा. आपल्याला मनापासून शुभेच्छा, असे रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…’, अमृता फडणवीसांचे नवे गाणे प्रदर्शित

गेल्या अनेक दिवसांपासून नेटकऱ्यांना उत्सुकता असलेले अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे सोमवारी प्रदर्शित झाले. नाट्य संगीतावर आधारित ‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…’ हे गाणे सध्या चाहत्यांचा पसंतीस उतरत आहे.

अमृता फडणवीसांचं इंग्रजी गाणं

अमृता फडणवीस यांनी ‘व्हॅलेंटाईन डे’साठी एक इंग्रजी गाणंही रिलीज केले होते. अमृता फडणवीस यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर आणि ट्विटरवर हे नवं गाणं पोस्ट केलं आहे. शक्ती हासिजा यांनी या गाण्याचं दिग्दर्शन केलं आहे. प्रसिद्ध इंग्रजी गायक लिओनेल रिचीनं हे मूळ गाणं गायलं आहे. या गाण्यात लिओनेलने एका संगीत शिक्षकाची भूमिका साकारली आहे. या गाण्यात तो एका अंध मुलीच्या प्रेमात पडल्याचंही दाखवण्यात आलं आहे. हेच गाणं आता अमृता फडणवीस यांनी गायलं आहे.

‘तिला जगू द्या’ची वाहवा

अमृता फडणवीस यांचे गायनकौशल्य संपूर्ण राज्याला परिचित आहे. यापूर्वीही त्यांची अनेक गाणी सोशल मीडियावर हिट ठरली आहेत. अमृता फडणवीस यांनी भाऊबीजेनिमित्त एक गाणे रिलीज केले होते. ‘तिला जगू द्या’ या गाण्याचा एक व्हिडीओ अमृता यांनी आपल्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन पोस्ट केला होता. या व्हिडीओला दोन दिवसांमध्ये दहा लाख व्ह्यूज मिळाले होते. त्यांनी याआधी देखील अनेक गाणी गायली आहेत. बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्या हस्ते अमृता फडणवीस यांच्या गाण्याचा एक अल्बम देखील रिलिज झालेला आहे.

संबंधित बातम्या:

‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्तानं अमृता फडणवीसांचं इंग्रजी गाणं

VIDEO: अमृता फडणवीस यांचं हे नवं गाणं ऐकलंत का?

व्हॅलेंटाईनच्या दिवशी अमृता फडणवीसांचं नवं गाणं, आमदार महेश लांडगे म्हणतात, ‘नाईस व्हॉइस…!’

तयार राहा, माझं आणखी एक गाणं येतंय, अमृता फडणवीसांचा इशारा कोणाला?

(Amruta Fadnavis new song kuni mhanale released)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...