Amruta Fadnavis | ‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…’, अमृता फडणवीसांचे नवे गाणे प्रदर्शित!

Amruta Fadnavis | ‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…’, अमृता फडणवीसांचे नवे गाणे प्रदर्शित!
अमृता फडणवीस

आज (8 मार्च) महिला दिनाचे औचित्य साधत अमृता फडणवीसांचे नवे गाणे प्रदर्शित झाले आहे. नाट्य संगीतावर आधारित ‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…’ हे गाणे सध्या चाहत्यांचा पसंतीस उतरत आहे.

Harshada Bhirvandekar

|

Mar 08, 2021 | 5:38 PM

मुंबई : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) कायम सोशल मीडियावर चर्चेत असतात. आज (8 मार्च) महिला दिनाचे औचित्य साधत त्यांचे नवे गाणे प्रदर्शित झाले आहे. अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर करत याची माहिती दिली. नाट्य संगीतावर आधारित ‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…’ हे गाणे सध्या चाहत्यांचा पसंतीस उतरत आहे (Amruta Fadnavis new song kuni mhanale release on the occasion of womens day).

‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…हे माझे नाट्य संगीतावर आधारित गीत सादर करते, आज जागतिक महिला दिनी फक्त तुमच्या साठी !’, असे म्हणत अमृता फडणवीसांनी आपल्या नव्या गाण्याची माहिती दिली आहे.

नाट्य संगीतावर आधारित गाणे! पहा व्हिडीओ

काय आहे या गाण्यात?

गाण्याच्या सुरुवातीलाच एक त्रिकोणी कुटुंब दाखवलं गेलं आहे. या कुटुंबातील लहान मुलगी सुरेख पद्तीने हर्मोनियम वाजवताना दिसत आहे. आई वडिलांचा पाठींबा मात्र, आजोबांच्या धाकामुळे लोककलेत सहभागी होऊ शकत नसलेल्या एका मुलीची कथा या गाण्यात दाखवण्यात आली आहे.

ट्रोलर्सना इशारा

आठ मार्चला आपलं नवीन गाणं रिलीज होणार असल्याची माहिती अमृता फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. ट्रोलर्सना तयार राहण्याचाही इशाराही त्यांनी दिला होता. माझं आणखी एक गाणं येतंय, मी ट्रोलर्सना या गाण्यातून उत्तर देईन, असं मिसेस फडणवीस म्हणाल्या होत्या (Amruta Fadnavis new song kuni mhanale release on the occasion of womens day).

अमृता फडणवीसांचं इंग्रजी गाणं

अमृता फडणवीस यांनी ‘व्हॅलेंटाईन डे’साठी एक इंग्रजी गाणंही रिलीज केले होते. अमृता फडणवीस यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर आणि ट्विटरवर हे नवं गाणं पोस्ट केलं आहे. शक्ती हासिजा यांनी या गाण्याचं दिग्दर्शन केलं आहे. प्रसिद्ध इंग्रजी गायक लिओनेल रिचीनं हे मूळ गाणं गायलं आहे. या गाण्यात लिओनेलने एका संगीत शिक्षकाची भूमिका साकारली आहे. या गाण्यात तो एका अंध मुलीच्या प्रेमात पडल्याचंही दाखवण्यात आलं आहे. हेच गाणं आता अमृता फडणवीस यांनी गायलं आहे.

अमृता फडणवीसांच्या गळ्यात ‘जॅझ’ सुरावट

‘अंधार’ या आगामी चित्रपटासाठी अमृता फडणवीसांनी याआधी एक गाणं (Andhaar Daav Movie Song) गायलं होतं. जीत गांगुली यांनी अंधार चित्रपटातील हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. जॅझ संगीत पद्धतीचं हे गाणं आहे. ‘रोज रोज पाठीमागे सावली असेल ही अनोळखी, दूर दूर आसमंती आर्तता घुमेल ही कोणाची’ असे या गाण्याचे शब्द आहेत. अमृता फडणवीस यांनी ट्विटरवर या गाण्याची लिंक शेअर केली आहे.

‘तिला जगू द्या’ची वाहवा

अमृता फडणवीस यांचे गायनकौशल्य संपूर्ण राज्याला परिचित आहे. यापूर्वीही त्यांची अनेक गाणी सोशल मीडियावर हिट ठरली आहेत. अमृता फडणवीस यांनी भाऊबीजेनिमित्त एक गाणे रिलीज केले होते. ‘तिला जगू द्या’ या गाण्याचा एक व्हिडीओ अमृता यांनी आपल्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन पोस्ट केला होता. या व्हिडीओला दोन दिवसांमध्ये दहा लाख व्ह्यूज मिळाले होते. त्यांनी याआधी देखील अनेक गाणी गायली आहेत. बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्या हस्ते अमृता फडणवीस यांच्या गाण्याचा एक अल्बम देखील रिलिज झालेला आहे.

(Amruta Fadnavis new song kuni mhanale release on the occasion of womens day)

संबंधित बातम्या:

‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्तानं अमृता फडणवीसांचं इंग्रजी गाणं

VIDEO: अमृता फडणवीस यांचं हे नवं गाणं ऐकलंत का?

व्हॅलेंटाईनच्या दिवशी अमृता फडणवीसांचं नवं गाणं, आमदार महेश लांडगे म्हणतात, ‘नाईस व्हॉइस…!’

तयार राहा, माझं आणखी एक गाणं येतंय, अमृता फडणवीसांचा इशारा कोणाला?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें