AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी विरोधकांना म्हणाले, आंदोलनजीवी जमात; राष्ट्रवादीने व्हिडीओतून उडवली भाजपच्या आंदोलनांची खिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेत देशभरातील आंदोलनकर्त्यांना आंदोलनजीवी जमात म्हणून डिवचले आहे. (ncp slams narendra modi over andolan jivi comment)

मोदी विरोधकांना म्हणाले, आंदोलनजीवी जमात; राष्ट्रवादीने व्हिडीओतून उडवली भाजपच्या आंदोलनांची खिल्ली
| Updated on: Feb 08, 2021 | 4:45 PM
Share

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेत देशभरातील आंदोलनकर्त्यांना आंदोलनजीवी जमात म्हणून डिवचले आहे. मोदींच्या या विधानावर देशभरातून प्रतिक्रिया उमटत असून राष्ट्रवादीनेही एक व्हिडीओ जारी करून मोदींच्या या विधानाची खिल्ली उडवली आहे. भाजपने आजवर केलेले आंदोलन आणि भाजप नेत्यांची आंदोलनावरील भूमिका याचा या व्हिडीओत समावेश असून त्यातून भाजपचा चेहराच दुटप्पी असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. (ncp slams narendra modi over andolan jivi comment)

राष्ट्रवादीने एक मिनिटाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर ‘ही पाहा, हीच ती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख केलेली नवीन ‘आंदोलनजीवी’ जमात’ असं कॅप्शन दिलं आहे. तसेच व्हिडीओवर पाच कावळ्यांचे फोटो दाखवण्यात आले आहेत. या व्हिडीओच्या सुरुवातीला पंतप्रधानांचं संसदेतील आजचं 13 सेंकदाचं भाषण दाखवण्यात आलं आहे. देशात आंदोलनजीवी नावाची नवी जमात आल्याचं मोदी या व्हिडीओत म्हणताना दिसत आहे. त्यानंतर या व्हिडीओत भाजप आणि विश्व हिंदू परिषदेने आजवर घेतलेल्या आंदोलनाचे फोटो दाखवण्यात आले आहेत. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे बाईट्सही दाखवण्यात आले असून त्यात ते राज्य सरकारला आंदोलन करण्याचा इशारा देत असताना दाखवलं आहे. हे फोटो आणि बाईट्स दाखवताना फोटो, बाईट्स संपताच पार्श्वभागाला मोदींचा आंदोलनजीवी हा शब्द ऐकायला येतो. त्यानंतर खवचट हसण्याचा आवाज येत असून या व्हिडीओतून राष्ट्रवादीने भाजपच्या आंदोलनाची खिल्ली उडवल्याचं दिसून येत आहे.

फोटो, बाइटमधून हल्ला

वीज कनेक्शन तोडू नये म्हणून भाजपच्या महिला आघाडीने केलेलं आंदोलन, वीज कार्यालयाला भाजपने केलेलं टाळे ठोको आंदोलन, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचं आंदोलन, केंद्रात काँग्रेसचं सरकार असताना भाजप नेत्या स्मृती ईराणी यांनी केलेलं गॅस सिलिंडर दरवाढीविरोधातील आंदोलन आदींचे फोटो या व्हिडीओत दाखवण्यात आले आहेत. यात फडणवीसांचं बाईट आहे. जर गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही आंदोलन करू, असा इशारा देताना ते दिसत आहे. तर भाजपचं आंदोलन हे जनआंदोलन कधी झालं हे कळणारच नाही, असं चंद्रकांत पाटील सांगताना दिसत आहेत. त्याशिवाय आम्ही ठिय्या आंदोलन करत आहोत, असं सोमय्या सांगत असल्याचंही या व्हिडीओत ऐकायला मिळत आहे.

मोदी म्हणाले, आंदोलनजीवी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी कृषी कायद्यावर आपली भूमिका व्यक्त केली. तसेच देशात काही ठिकाणी आंदोलकांची एक टोळी निर्माण झाल्याचंही त्यांनी हसता हसता सांगितलं. काही बुद्धिजीवी असतात. काही श्रमजीवी असतात. परंतु मागच्या काही काळात आंदोलनजीवी पाहायला मिळत आहेत. देशात कुठेही काहीही झाले तर हे आंदोलनजीवी सर्वात आधी तिथे असतात. कधी पडद्याच्या मागे असतात तर पडद्या पुढे असतात. अशा लोकांना ओळखून आपल्याला त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. हे लोक स्वत: आंदोलन करत नाहीत. त्यांची ती क्षमताही नाही. मात्र, एखादं आंदोलन सुरू असेल तर हे लोक तिथे पोहोचतात. हे आंदोलनजीवी परजीवी आहेत. ते प्रत्येक ठिकाणी मिळतात, अशी शब्दांत उपद्रव निर्माण करणाऱ्यांचा मोदींनी समाचार घेतला होता. (ncp slams narendra modi over andolan jivi comment)

संबंधित बातम्या:

Narendra Modi Parliament Speech | भाषण संसदेत, डोळा बंगालच्या मतांवर? नरेंद्र मोदी यांच्या भाषणात बंगाल

‘अवसर तेरे लिए खडा है, फिर भी तू चूपचाप पडा है’; मैथिली शरण गुप्त यांच्या कवितेतून मोदींचा संवाद!

श्रमजीवी, बुद्धिजीवी ऐकले होते, आता आंदोलनजीवी अशी नवी जमात आलीय: मोदी

(ncp slams narendra modi over andolan jivi comment)

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र….

उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!