मध्य रेल्वेवर आज मेगाब्लॉक, प्रवाशांनो आज रेल्वे प्रवास करणं टाळा, पाहा वेळापत्रक

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात कर्जत स्थानकातील प्री नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी मेगाब्लॉकची मालिका सुरु आहे. याचा थेट परिणाम आता लोकल सेवेवर होत आहे.

मध्य रेल्वेवर आज मेगाब्लॉक, प्रवाशांनो आज रेल्वे प्रवास करणं टाळा, पाहा वेळापत्रक
| Updated on: Oct 03, 2025 | 8:56 AM

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात कर्जत स्थानकातील प्री नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी मेगाब्लॉकची मालिका सुरु आहे. याचा थेट परिणाम आता लोकल सेवेवर होत आहे. या कामासाठी ३, ४ आणि १० ऑक्टोबर रोजी विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात आला आहे. या काळात नेरळ-कर्जत आणि खोपोली-कर्जत मार्गावरील लोकल सेवा पूर्णपणे विस्कळीत होणार आहेत. या बदलांमुळे या उपनगरीय मार्गावर प्रवास करणाऱ्या हजारो नोकरदार आणि विद्यार्थ्यांचे मोठे हाल होण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, कर्जत यार्डाच्या पुनर्रचनेसाठी हे महत्त्वपूर्ण प्री नॉन-इंटरलॉकिंग काम हाती घेण्यात आले आहे. आज ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.२० ते सायंकाळी ६ पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.२० ते सायंकाळी ४.४५ पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यानंतर १० ऑक्टोबर रोजी सकाळी ११.२० ते सायंकाळी ४.२० पर्यंत मेगाब्लॉक असेल. हा ब्लॉक भिवपुरी स्थानक, जांब्रुंग केबिन, ठाकूरवाडी, नागनाथ केबिन ते कर्जत यार्डापर्यंत असणार आहे. यानुसार ५ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर या कालावधीत लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या आणि लोकलच्या वेळापत्रकावर कोणताही परिणाम होणार नाही.

दरम्यान ब्लॉकच्या काळात उपनगरीय रेवेगाड्यांच्या मार्गात बदल करण्यात येणार आहेत. त्यानुसार ३ ऑक्टोबरला नेरळ – कर्जत आणि कर्जत – खोपोली दरम्यान अप आणि डाऊन लोकल सेवा उपलब्ध असणार नाही. तसेच ४ आणि १० ऑक्टोबर यादरम्यान कर्जत ते खोपोली दरम्यान अप आणि डाऊन लोकल सेवा उपलब्ध नसेल.

आजचे वेळापत्रक कसं असणार?

लोकलची वेळ आणि मार्ग वेळापत्रकातील बदल
पूर्ण रद्द दुपारी २.५५ वाजता सुटणारी खोपोली – कर्जत लोकल ही लोकल पूर्णपणे रद्द करण्यात येईल.
नेरळपर्यंत मर्यादित सकाळी ९.०१, ९.३०, ९.५७ आणि सकाळी ११.१४ वाजता सुटणाऱ्या सीएसएमटी – कर्जत लोकल या लोकल नेरळपर्यंतच चालवण्यात येतील. नेरळ – कर्जत लोकल सेवा रद्द.
नेरळपर्यंत मर्यादित दुपारी १२.०५ वाजता ठाणे – कर्जत लोकल ही लोकल नेरळपर्यंतच चालवण्यात येईल. नेरळ – कर्जत लोकल सेवा रद्द.
नेरळपर्यंत मर्यादित दुपारी १२.२० वाजता सुटणारी सीएसएमटी – खोपोली लोकल ही लोकल नेरळ येथे रद्द होईल. नेरळ – खोपोली लोकल सेवा उपलब्ध नसेल.
अंबरनाथपर्यंत मर्यादित सकाळी १०.३६ वाजता आणि दुपारी २.४५ वाजता सुटणारी सीएसएमटी – कर्जत लोकल या लोकल अंबरनाथपर्यंत चालवण्यात येतील. अंबरनाथ – कर्जत लोकल सेवा रद्द.
नेरळहून सुटणाऱ्या सकाळी १०.४३, ११.१९, दुपारी १२, १ आणि दुपारी १.५५ वाजता सुटणाऱ्या कर्जत – सीएसएमटी लोकल या लोकल नेरळ येथून नियोजित वेळापत्रकानुसार चालतील.
नेरळहून सुटणाऱ्या दुपारी १.२७ वाजता सुटणारी कर्जत – ठाणे लोकल ही लोकल नेरळ येथून नियोजित वेळापत्रकानुसार चालवण्यात येईल.
अंबरनाथहून सुटणाऱ्या दुपारी १२.२३ आणि दुपारी ४ वाजता सुटणाऱ्या कर्जत – सीएसएमटी लोकल या लोकल अंबरनाथ येथून नियोजित वेळापत्रकानुसार धावतील.
तसेच कर्जत-खोपोली मार्गावर अवलंबून असलेल्या प्रवाशांना ३, ४ आणि १० ऑक्टोबर रोजी मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. विशेषतः ३ ऑक्टोबर रोजी नेरळ-कर्जत मार्ग बंद असल्याने या भागातील प्रवाशांना नेरळहून पुढे एसटी बस, खासगी टॅक्सी किंवा ऑटो रिक्षा यांसारख्या पर्यायी वाहतूक साधनांचा वापर करावा, असे आवाहन सरकारने केले आहे.
पाहा व्हिडीओ :

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us