VIDEO : अक्षय कुमारकडून हटके पद्धतीत नवीन वर्षाचे स्वागत

मुंबई : वर्ष 2019 ची सुरुवात झाली आहे. प्रत्येक सेलेब्रिटीने नवीन वर्षाचे स्वागत आपल्या वेगवेगळ्या अंदाजात केले आहे. मात्र सर्वात हटके नव वर्षाचे स्वागत बॉलीवूडमधील खिलाडी सुरपस्टार अक्षय कुमारने केले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या सूर्योदयावेळी व्यायाम करुन नवीन संकल्प अक्षयने केला आहे. हा व्यायाम करतानाचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. अक्षय कुमार आपल्या […]

VIDEO : अक्षय कुमारकडून हटके पद्धतीत नवीन वर्षाचे स्वागत
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM

मुंबई : वर्ष 2019 ची सुरुवात झाली आहे. प्रत्येक सेलेब्रिटीने नवीन वर्षाचे स्वागत आपल्या वेगवेगळ्या अंदाजात केले आहे. मात्र सर्वात हटके नव वर्षाचे स्वागत बॉलीवूडमधील खिलाडी सुरपस्टार अक्षय कुमारने केले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या सूर्योदयावेळी व्यायाम करुन नवीन संकल्प अक्षयने केला आहे. हा व्यायाम करतानाचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अक्षय कुमार आपल्या फिटनेसच्या बाबतीत प्रसिद्ध आहे. सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तो आपल्या आरोग्याची काळजी घेत असतो. यामुळे आजही बॉलीवूडमधील सर्वात फिट अभिनेत्यांच्या यादीत अक्षयचा समावेश आहे. विशेष म्हणजे अक्षय आपल्या चित्रपटातील अॅक्शन सिनही तो स्वत:च शूट करतो.

या नवीन वर्षात अर्थात 2019 मध्ये अक्षय कुमारचे चार नवीन चित्रपट येणार आहेत. धर्मा प्रोडक्शनच्या केसरी, गुड न्यूज, मिशन मंगल आणि हाऊसफुल्ल 4 या चित्रपटांत अक्षय दिसणार आहे.