AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी: NIA चे अधिकारी सचिन वाझेंना पीपीई किट घालून चालायला लावणार

एकदा या इनोव्हा कारमधील ड्रायव्हर बाहेर उतरला होता. त्यावेळी या ड्रायव्हरने ओळख लपवण्यासाठी पीपीई किट घातल्याचे दिसून आले होते. | Sachin Vaze PPE kit

मोठी बातमी: NIA चे अधिकारी सचिन वाझेंना पीपीई किट घालून चालायला लावणार
यामध्ये या कटात सहभागी असलेली इनोव्हा कार अनेकदा अंबानी यांच्या निवासस्थानाच्या परिसरात फेऱ्या मारताना दिसून आली होती. एकदा या इनोव्हा कारमधील ड्रायव्हर बाहेर उतरला होता.
| Updated on: Mar 15, 2021 | 10:30 AM
Share

मुंबई: मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके सापडल्याच्या प्रकरणाचा तपास आता निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) याप्रकरणात सचिन वाझे यांच्याविरोधात ठोस पुरावे सापडले आहेत. त्यानंतर आता एनआयएचे अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना पीपीई किट घालून चालायला लावणार असल्याची माहिती सूत्रांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिली आहे. (NIA officers will tell Sachin Vaze to walk wearing PPE kit)

काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील एक सीसीटीव्ही फुटेज तपासयंत्रणांच्या हाती लागले होते. यामध्ये या कटात सहभागी असलेली इनोव्हा कार अनेकदा अंबानी यांच्या निवासस्थानाच्या परिसरात फेऱ्या मारताना दिसून आली होती. एकदा या इनोव्हा कारमधील ड्रायव्हर बाहेर उतरला होता. त्यावेळी या ड्रायव्हरने ओळख लपवण्यासाठी पीपीई किट घातल्याचे दिसून आले होते. ही व्यक्ती सचिन वाझेच असल्याचा एनआयएला दाट संशय आहे. त्यामुळे आता एनआयएचे अधिकारी सचिन वाझे यांना पीपीई किट परिधान करुन चालायला लावणार आहेत. त्यांच्या हालचालीवरुन ती व्यक्ती सचिन वाझेच होती का, याचा शोध एनआयएचे अधिकारी घेतील. त्यामुळे आता या सगळ्यातून काय निष्कर्ष पुढे येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

त्या इनोव्हाचं CCTV फुटेज NIA च्या हाती

अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याच्या कटातील संशयित सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्या अडचणीत आता मोठी भर पडली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) तांत्रिक बाबी आणि सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास करुन अनेक पुरावे समोर आणले आहेत. यामध्ये अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्यासाठी वापरण्यात आलेल्या दोन्ही गाड्यांचा सचिन वाझे यांच्या गुन्हे तपास शाखेशी (CIU) संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे. (Innova car outside ambani residence in CCTV footage belongs to CIU unit of Mumbai Police)

या कटासाठी वापरण्यात आलेली इनोव्हा कार CIU युनिटच्या अधिकाऱ्यांनी वापरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याची दोन सीसीटीव्ही फुटेज एनआयएला मिळाली आहेत. यापैकी पहिले फुटेज हे 13 मार्चचे आहे. यामध्ये ही पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार दुपारी 3.15 वाजता पोलीस आयुक्तालयातून बाहेर पडल्याचे दिसत आहे. त्यानंतर 24 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजून 24 मिनिटांनी ही कार पोलीस मुख्यालयातून बाहेर पडली होती. त्यानंतर ही इनोव्हा ठाण्याला गेली. यादरम्यान इनोव्हा गाडीची नंबरप्लेट बदलण्यात आल्याचा संशय एनआयएला आहे. त्यामुळे सचिन वाझे यांच्यासह संपूर्ण CIU युनिट अडचणीत आले आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर 25 फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आली होती. या परिसरातली सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर 24 फेब्रुवारीला रात्री साधारण एक वाजता अंबानींच्या घराबाहेर दोन गाड्या आल्या होत्या. यापैकी स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके होती. ही गाडी पार्क केल्यानंतर चालक गाडीतून खाली उतरला होता. त्यानंतर मागून एक इनोव्हा कार आली त्यामध्ये बसून तो निघून गेला होता.

संबंधित बातम्या:

अंबानींच्या घराबाहेर कार सोडताना ओळख लपवण्यासाठी ‘त्या’ ड्रायव्हरकडून पीपीई किटचा वापर

सचिन वाझे यांचा पाठलाग होत असल्याचा दावा, वेगवेगळ्या नंबरप्लेटमुळं ‘त्या’ गाडीविषयी संभ्रम वाढला?

हिरेन यांची गाडी माझ्याकडे असणं हा गुन्हा नाही; सचिन वाझेंनी फडणवीसांचे आरोप फेटाळले

सचिन वाझेंनीच अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी प्लॉट केली; NIA चा आरोप

(NIA officers will tell Sachin Vaze to walk wearing PPE kit)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.