सचिन वाझेंनीच अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी प्लॉट केली; NIA चा आरोप

सचिन वाझेंनीच अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी प्लॉट केली, असा आरोप NIA नी केला आहे. (Sachin Waze plotted a explosives car)

सचिन वाझेंनीच अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी प्लॉट केली; NIA चा आरोप
sachin waze

मुंबई : मुकेश अंबानींच्या अँटेलिया बंगल्याशेजारी स्कॉर्पिओमध्ये स्फोटकं ठेवल्याच्या प्रकरणात तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) यांना NIA कडून अटक करण्यात आली. त्यामुळेच एकच खळबळ उडाली आहे. सचिन वाझेंवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सचिन वाझेंनीच अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी प्लॉट केली, असा आरोप NIA नी केला आहे. (Sachin Waze plotted a explosives car outside Ambani’s house NIA Allegation)

विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल

विशेष म्हणजे सचिन वाझेंनी अंबानींच्या बंगल्याशेजारी स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीला पार्क करण्याच्या गुन्ह्यात महत्त्वाची भूमिका बजावली, असा आरोप करण्यात आला आहे. या आरोपाखाली त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हेसुद्धा दाखल करण्यात आले आहेत. गेल्या 15 दिवसांत अंबानी स्फोटके प्रकरणातही सगळ्यात मोठी घडामोड म्हणून पाहिली जाते आहे. त्यामुळेच सचिन वाझेंच्या अटकेनं खळबळ उडाली आहे.

स्फोटकांची गाडी उभी करण्यात वाझेंचा सहभाग?

स्फोटकांच्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणातही सचिन वाझेंवर आरोप करण्यात आले आहेत. सचिन वाझेंवर मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी आणि स्फोटकांच्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी देखील आरोप होत आहेत. त्यापैकी एनआयए सध्या अंबानी स्फोटक प्रकरणाचा तपास करत आहे.

केंद्र सरकारच्या आदेशानुसार, एनआयएने अंबानी स्फोटक प्रकरण राज्याकडून आपल्याकडे हस्तांतरीत केलं जातं. याच प्रकरणी एनआयए कसून तपास करतं आहे. एनआयएने सचिन वाझेंवर अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांची गाडी उभी करण्यात सहभाग घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र अद्याप याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

इनोव्हा कार NIA च्या ताब्यात

तर दुसरीकडे रविवारी रात्री जवळपास 3.45 एक व्हाईट इनोव्हा NIA च्या अधिकारी कार्यालयात टोईंग करुन आणल्याचे बोललं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून NIA च्या अधिकाऱ्यांकडून या गाडीचा तपास करण्यात येत होता. अंबानींच्या घरच्या बाहेर मिळालेल्या गाडीमध्ये जिलेटीन आढळून आला होता. त्यागाडीच्या पाठीमागे सीसीटीव्हीमध्ये एक इनोव्हा गाडी दिसत आहे. NIA ने आणलेल्या गाडी तीच इनोव्हा कार आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सचिन वाझे यांना अटक, 13 तासांच्या चौकशीनंतर बेड्या

मुकेश अंबानींच्या अँटिलिया बंगल्याशेजारी स्कॉर्पिओमध्ये स्फोटकं ठेवल्याच्या प्रकरणात तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना शनिवारी रात्री उशीरा NIA कडून अटक करण्यात आली. जवळपास 13 तास त्यांची कसून चौकशी करण्यात आली. यानंतर एनआयएने सचिन वाझे यांनीच अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार ठेवली, असा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे सचिन वाझे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. रविवारी सकाळी 11 वाजता त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल. यावेळी त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाईल. त्यामुळे आता पोलीस कोठडीतील चौकशीत आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

सचिन वाझेंवर कोणते आरोप?

स्फोटके बाळगणे त्याचबरोबर अंबानी यांच्या बंगल्याशेजारी स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीला पार्क करण्याच्या गुन्ह्यात महत्त्वाची भूमिका असण्याच्या आरोपाखाली त्यांना बेड्या ठोकण्यात आल्यात. त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हेसुद्धा दाखल करण्यात आले आहेत. (Sachin Waze plotted a explosives car outside Ambani’s house NIA Allegation)

संबंधित बातम्या : 

पोलीस फडणवीसांना गुप्त माहिती पुरवतात, हे सरकारसाठी शुभसंकेत नाहीत; संजय राऊतांचा ठाकरे सरकारला इशारा

गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांची हकालपट्टी करा ; सचिन वाझेंच्या अटकेनंतर भाजप आणखी आक्रमक

Published On - 8:16 am, Sun, 14 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI