गिरगाव चौपाटीवर पोलिसांची बोट बुडाली

| Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM

मुंबई: मुंबईकर सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागताच्या धामधुमीत व्यस्त असताना, मुंबईकरांचे संरक्षक असलेल्या मुंबई पोलिसांची मोठी दुर्घटना टळली. गिरगाव चौपाटी इथं सहा पोलिसांची बोट बुडाली. मात्र जीवरक्षक प्रतीक वाघेच्या प्रसंगावधानामुळे सहा पोलिसांचे प्राण वाचले. मुंबईच्या समुद्रकिनारी गर्दी रोजच असते. मात्र नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईतील समुद्र किनारे भरगच्च होतात. त्या पार्श्वभूमीवर गिरगाव चौपाटीवर कोणताही अनुचित […]

गिरगाव चौपाटीवर पोलिसांची बोट बुडाली
Follow us on

मुंबई: मुंबईकर सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागताच्या धामधुमीत व्यस्त असताना, मुंबईकरांचे संरक्षक असलेल्या मुंबई पोलिसांची मोठी दुर्घटना टळली. गिरगाव चौपाटी इथं सहा पोलिसांची बोट बुडाली. मात्र जीवरक्षक प्रतीक वाघेच्या प्रसंगावधानामुळे सहा पोलिसांचे प्राण वाचले. मुंबईच्या समुद्रकिनारी गर्दी रोजच असते. मात्र नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईतील समुद्र किनारे भरगच्च होतात. त्या पार्श्वभूमीवर गिरगाव चौपाटीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात असतो.

समुद्र किनाऱ्यांसह आत समुद्रातही सुरक्षा रक्षकांच्या बोटी तैनात केल्या जातात.पोलिसांचं एक पथक  या बोटीत होतं. या बोटीतून पोलीस गस्ती नौकेपर्यंत जातात. सहा पोलीस बोटीतून गस्तीनौकेपर्यंत जात होते, त्यावेळी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांची बोट समुद्रात उलटली. किनाऱ्यापासून जवळपास 300 मीटर आत पोलिसांची बोट बुडत होती. नेमकं काय घडलंय हे क्षणभर कोणाला कळलं नाही.  बोट उलटल्याचं लक्षात येताच, जीवरक्षक प्रतीक वाघे दुसरी बोट घेऊन मदतीसाठी धावला.

त्याचवेळी पोलिसांचीही दुसरी गस्तीनौकाही दुर्घटनास्थळी पोहोचली. पोलीस आणि प्रतीक वाघे यांनी मिळून सर्व पोलिसांना बाहेर काढले. मात्र त्यावेळी या सहाही पोलिसांकडे लाईफ जॅकेट नसल्याचं समोर आलं.