AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध गायिकेला नवऱ्यानेच दिलं विष; लंडनच्या शवागृहात 5 महिने पडून होता तिचा मृतदेह

नाझियाच्या मृत्यूनंतर लंडन पोलिसांनी सखोल चौकशी केली. पाकिस्तानी वृत्तवाहिनी जिओ टीव्हीनुसार, नाझियाच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह पाच महिने लंडनच्या शवागृहात तपासणीसाठी ठेवण्यात आला होता.

प्रसिद्ध गायिकेला नवऱ्यानेच दिलं विष; लंडनच्या शवागृहात 5 महिने पडून होता तिचा मृतदेह
नाझिया हसनImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 10, 2026 | 8:57 AM
Share

कधीकधी प्रसिद्धीच्या झगमगाटामागे एक अशी वेदनादायी कहाणी असते, ज्याने मन हळवं होतं. पाकिस्तानची पॉप म्युझिक क्वीन म्हणून ओळखली जाणारी नाझिया हसन अशीच एक स्टार होती. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षापासून तिने आपल्या सुमधूर आवाजाने संपूर्ण जगात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. एक संपूर्ण पिढी तिच्या गाण्यांवर मनसोक्त नाचली. परंतु नाझियाला तिच्या वैयक्तिक आयुष्यात असंख्य वेदना, विश्वासघात आणि वाद यांच्याशी झुंद द्यावी लागली. नाझिया हसनचा जन्म 1965 मध्ये पाकिस्तानमधील कराची इथं झाला. अवघ्या 15 व्या वर्षी तिने ‘कुर्बानी’ या बॉलिवूड चित्रपटासाठी ‘आप जैसा कोई’ हे सुपरहिट गाणं गायलं होतं. या गाण्यामुळे नाझिया रातोरात स्टार बनली. त्यासाठी तिला फिल्मफेअर पुरस्कारदेखील मिळाला होता.

1995 मध्ये नाझियाने पाकिस्तानी उद्योगपती मिर्झा इश्तियाक बेगशी लग्न केलं. लग्नानंतर तिने गायन सोडून दिलं. सुरुवातीला या दोघांचं वैवाहिक आयुष्यात सर्वकाही ठीक होतं. परंतु काही काळानंतर त्यांच्यात वाद निर्माण होऊ लागले. नाझियाने तिच्या पतीवर कौटुंबिक हिंसाचार आणि मानसिक छळाचा आरोप केला. लग्नानंतर तिचं जीवन जगणंच अत्यंत कठीण झाल्याचा खुलासा तिने अनेक मुलाखतींमध्ये केला होता. नाझियाने स्वत: एका मुलाखतीत सांगितलं होतं की तिचा पती तिला आनंदी जीवन जगण्याचं नाटक करण्यासाठी दबाव टाकत होता.

नाझिया हसन आणि तिचा पती

नाझिया आणि तिच्या कुटुंबाने असाही आरोप केला की तिच्या पतीने तिला विष देण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी या प्रकरणाने माध्यमांचं लक्ष वेधलं होतं. हा वाद एवढ्यावरच थांबला नाही. नंतर हेसुद्धा उघडकीस आलं की नाझियाच्या पतीचं यापूर्वी दोनदा लग्न झालं होतं, परंतु तिला याची माहितीच नव्हती. या खुलाशामुळे हा वाद आणखीच वाढला आणि त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला.

1997 मध्ये नाझियाने मुलाला जन्म दिला. अखेर वैवाहिक आयुष्यातील वाढत्या संघर्षांमुळे तिने 2000 मध्ये मुस्लीम कायद्यानुसार पतीला घटस्फोट दिला. घटस्फोटानंतर काही महिन्यांतच नाझियाचा अवघ्या वयाच्या 35 व्या वर्षी निधन झालं. ती बऱ्याच काळापासून फुफ्फुसांच्या कर्करोगाशी झुंज देत होती आणि लंडनमध्ये तिच्यावर उपचार सुरू होते, असं म्हटलं जातं. उपचारादरम्यान नाझियाने तिच्या वकील आणि अनेक साक्षीदारांसमोर एक जबाब दिला, ज्यामध्ये तिने म्हटलं होतं की तिचा पती तिला विष देत होता आणि सौम्य विषबाधेमुळे तिच्या अवयवांचं नुकसान होत होतं. नाझियाने तिच्या मृत्यूची चौकशी करण्याची विनंती केली होती.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!