AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ghatkopar Dahi Handi 2026 : मुंबईतील मनसेच्या विश्वविक्रमी दहीहंडीला पोलिसांनी दिला झटका, ऐनवेळी नाकारली परवानगी

Ghatkopar Dahi Handi 2026 : आज मुंबईत सर्वत्र दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा होणार आहे. लाखो रुपयांची पारितोषिकं असलेल्या दहीहंडी फोडण्यासाठी दहीहंडी पथकांमध्ये चुरस रंगणार आहे. त्याचवेळी घाटकोपरमध्ये मात्र तणाव वाढला आहे. पोलिसांनी ऐनवेळी परवानगी नाकारली आहे.

Ghatkopar Dahi Handi 2026 : मुंबईतील मनसेच्या विश्वविक्रमी दहीहंडीला पोलिसांनी दिला झटका, ऐनवेळी नाकारली परवानगी
Ghatkopar Dahi Handi 2026
| Updated on: Sep 05, 2026 | 8:35 AM
Share

अक्षय मंकणी, प्रतिनिधी : घाटकोपरमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दहीहंडी उत्सवाला मुंबई पोलिसांनी मोठा झटका दिला आहे. आज दहीहंडी साजरी होणार त्याच्या बरोबर एकदिवस आधी म्हणजे काल परवानगी नाकारण्यात आली. आज राज्यभरात दहीहंडीचा उत्साह आहे. पण मुंबईत मनसेच्या घाटकोपरमधील दहीहंडीला परवानगी नाकारण्यात आली आहे. मनसे नेते गणेश चुक्कल यांनी या दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं आहे. ते दरवर्षी दहीहंडी उत्सवाचं आयोजन करतात. पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली असली तर गणेश चुक्कल दहीहंडी साजरी करण्यावर ठाम आहेत. मनसेकडून मुंबईतील विश्वविक्रमी दहीहंडी अशी या दहीहंडीची जाहीरात करण्यात आली होती. 51 लाख रुपयाचं पारितोषिक या दहीहंडीत ठेवण्यात आलेलं. मोठी इनामी रक्कम असल्याने अनेक मोठी मंडळं ही दहीहंडी फोडण्यासाठी येतील अशी अपेक्षा आहे. मनसे नेते गणेश चुक्कल यांच्या पुढाकाराने अमृतनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे.

दिल्लीतील जंतर-मंतरवरील जेन झी च्या यशस्वी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घाटकोपरच्या मनसेतील दहीहंडी उत्सवात ‘जेन-झी’ चा सत्कार करण्यात येणार होता.दहीहंडी उत्सवात जेन झी पिढीच्या आंदोलनाला सलाम करण्यात येणार आहे. त्यामुळे ही परवानगी देऊन, त्यांनी नाकारली असं आयोजकांचं म्हणणं आहे. घाटकोपर पोलिसांकडून मनसे नेते गणेश चुक्कल यांच्या दहीहंडीला ऐनवेळी परवानगी नाकारण्यात आली आहे. दहीहंडीच्या स्टेजमुळे आपतकालीन मार्ग बंद होणार असा अहवाल पोलिसांकडून पत्रात देण्यात आला आहे. पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी दहीहंडी होणार असा निर्धार दहीहंडी आयोजकांकडून करण्यात आला आहे.

पोलिसांचं म्हणणं काय?

मुंबई पोलीस आणि महापालिकेने यापूर्वी परवानगी दिल्याचा आयोजकांनी दावा केला आहे.मात्र दहीहंडीच्या एक दिवस आधी पोलिसांकडून परवानगी नाकारल्याचे पत्र आयोजकांना देण्यात आलं. अचानक परवानगी नाकारल्याने घाटकोपरमध्ये तणावाचे वातावरण आहे. ⁠दहीहंडीच्या स्टेजमुळे आपत्कालीन मार्ग बंद होण्याचा धोका असल्याने परवानगी नाकारत असल्याचं पोलिसांनी पत्रात म्हटलं आहे. स्टेज रस्त्याच्या मधोमध उभारल्याने सागर पार्ककडे जाणारा प्रस्तावित 90 फुटांचा रस्ता पूर्णपणे बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका व अग्निशमन वाहनांना मार्ग मिळणार नसल्याचा पोलिसांचा अहवाल.

Follow Us
जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत आंदोलकांची मोठी गर्दी
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत मराठा आंदोलकांची मोठी गर्दी
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह बघाच
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह; मध्यरात्री बाळकृष्णाचा जन्मसोहळा, मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा