AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: मुंबई बँकेवर प्रवीण दरेकरांचंच वर्चस्व, आधी 17 जागा जिंकल्या; आता…

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर पुन्हा एकदा राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे.

VIDEO: मुंबई बँकेवर प्रवीण दरेकरांचंच वर्चस्व, आधी 17 जागा जिंकल्या; आता...
प्रवीण दरेकर, भाजप नेते
| Edited By: | Updated on: Jan 03, 2022 | 1:43 PM
Share

मुंबई: मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर पुन्हा एकदा राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. दरेकर यांच्या नेतृत्वाखालील 21 पैकी 21 जागा जिंकून निर्विवाद विजय मिळवला आहे.

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनेलचे 21 पैकी 21 उमेदवार विजयी झाले होते. याआधी 21 पैकी 17 उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. उर्वरीत 4 जागेवरील सहकार पॅनेलचे उमेदवार आज विजयी घोषित करण्यात आले होते. दरेकर यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याला म्हणावं तसं यश आलं नव्हतं.

चारही जागा जिंकल्या

या निवडणुकीत 45 टक्के मतदान झाले होते. 4 हजार 581 मतदारांनी निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला होता. 21 संचालकांच्या निवडणुकीसाठी ही निवडणूक घेण्यात आली होती. त्यापैकी 17 जणांनी बिनविरोध झाली होती. प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांनी सर्व पक्षीय नेत्यांची भेट घेऊन ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यानंतरही चार जागांसाठी मतदान झाले. त्या जागाही सहकार पॅनलच्या पदरात पडल्याने बँकेवर सहकार पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व निर्माण झालं आहे.

दरेकरांची पहिली प्रतिक्रिया

या विजयाबद्दल मुंबईकरांचं, मुंबईतील सहकारातील सर्व संस्थांचं मनापासून आभार मानतो. कधी नव्हे एवढं अभूतपूर्व यश आमच्या पॅनलला दिलं आहे. सर्व प्रथम 21 पैकी 17 जागा निवडून दिल्या. त्यापैकी 4 जागांची निवडणूक काही लोकांच्या हट्टापायी, अडेलतट्टू भूमिकेमुळे घ्यावी लागली. पण त्याही जागा आम्ही जिंकलो, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर म्हणाले.

दरेकर मजूर वादाने निवडणूक गाजली

दरम्यान, या निवडणुकीत प्रवीण दरेकर यांनी मजूर वर्गातून उमेदवारी अर्ज भरला होता. त्यामुळे वाद झाला होता. त्याला विरोधी गटाने आक्षेप घेतला होता. दरेकर मजूर कसे असू शकतात, मजुराची व्याख्या काय असे सवाल या निमित्ताने करण्यात आले होते.

कुणाला किती मते

चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत विठ्ठल भोसले यांनी सुखदेव चौगुले यांना धूळ चारली. विठ्ठल भोसले यांना 18 तर सुखदेव चौगुले यांना 16 मते मिळाली. तर पुरुषोत्तम दळवी यांनी कमलाकर नाईक यांचा जबरदस्त पराभव केला. पुरुषोत्तम दळवी यांना 131 मते पडली. तर कमलाकर नाईक यांना अवघी 59 मते मिळाली. जयश्री पांचाळ यांना 332 मतं तर, शालिनी गायकवाड यांना 188 मतं मिळालीत. तर अनिल गजरे हे 4 हजार मते घेऊन विजयी झाले. तर यलाप्पा कुशाळकर यांना अवघी 350 मते मिळाली.

आजचे विजयी उमेदवार

मध्यवर्ती ग्राहक (होलसेल कंझ्यूमर्स) मतदार संघ

विठ्ठल भोसले (NCP)

प्राथमिक ग्राहक मतदारसंघ

पुरुषोत्तम दळवी (INC)

महिला सहकारी संस्था मतदारसंघ

जयश्री पांचाळ (NCP)

भटक्या जाती,विमुक्त जमाती व विशेष मागासवर्गीय मतदार संघ

अनिल गजरे (BJP)

बिनविरोध झालेल्या 17 उमेदवारांची नावे

नागरी सहकारी बँक

संदीप सीताराम घनदाट आ. प्रविण यशवंत दरेकर

पगारदार सहकारी संस्था

आ. प्रसाद मिनेश लाड

नागरी सहकारी पतसंस्था

शिवाजीराव विष्णू नलावडे

गृहनिर्माण संस्था

आ. सुनील राजाराम राऊत अभिषेक विनोद घोसाळकर

मजूर सहकारी संस्था

आ. प्रविण यशवंत दरेकर आनंदराव बाळकृष्ण गोळे

औद्योगिक सहकारी संस्था

सिद्धार्थ तात्यासाहेब कांबळे विष्णू गजाभाऊ घुमरे

इतर सहकारी संस्था

नंदकुमार मानसिंग काटकर जिजाबा सीताराम पवार

व्यक्तिगत (वैयक्तिक)

सोनदेव बाळाजी पाटील

महिला राखीव मतदार संघ

शिल्पा अतुल सरपोतदार कविता प्रकाश देशमुख

अनुसूचित जाती/जमाती मतदार संघ

विनोद दामू बोरसे

इतर मागासवर्गीय मतदार संघ

नितीन धोंडीराम बनकर

संबंधित बातम्या:

VIDEO: पश्चिम बंगालमध्ये मिनी लॉकडाऊन लागला, महाराष्ट्रात काय?, लॉकडाऊन झाला तर कसा असेल; विजय वडेट्टीवारांनी दिली माहिती

लॉकडाऊन लागणार काय?; राज्याला किती लसींची गरज, मास्क कोणता वापरावा?; वाचा तुमच्या मनातील प्रश्नांना राजेश टोपेंचे उत्तर

जन्मदात्या आईची हत्या, वडिलांवर कोयत्याने वार, जमिनीच्या वादातून इंदापुरात मुलाचा हल्ला

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली