AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट, लोकलमधून प्रवासाची मुभा, रेल्वेचा राज्याच्या निर्णयाला ग्रीन सिग्नल

रेल्वे मंत्रालयानं मुंबईतील लोकलमधून प्रवास करण्यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना परवानगी दिली आहे. (Railway  granted permission  to school teachers & other non-teaching staff to travel by local train services)

मुंबईतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट, लोकलमधून प्रवासाची मुभा, रेल्वेचा राज्याच्या निर्णयाला ग्रीन सिग्नल
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Nov 13, 2020 | 8:33 PM
Share

मुंबई :  रेल्वे मंत्रालयानं मुंबईतील लोकलमधून प्रवास करण्यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना परवानगी दिली आहे. शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवास करताना वैध ओळखपत्र  सोबत बाळगणे आवश्यक असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. ओळखपत्र असल्याशिवाय रेल्वे स्थानकावर प्रवेश मिळणार नाही, असं रेल्वेनं स्पष्ट केलं आहे.  (Railway  granted permission  to school teachers & other non-teaching staff of schools to travel by suburban train services)

रेल्वेच्या या निर्णयामुळे मुंबई व उपनगरांत शाळेत शिकवणाऱ्या शिक्षक, शिक्षिका तसेच अन्य कर्मचाऱ्यांना मुंबई उपनगरीय लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा मिळणार आहे.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लोकलमधून प्रवासासाठी मुभा देण्याची विनंती केली होती. त्यांनी याबबत ट्विट केलं होते.

राज्य सरकारतर्फे 6 नोव्हेंबरला रेल्वेला पत्र लिहीले होते. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या महाप्रबंधकांना किशोरराजे निंबाळकर यांनी पत्र लिहीले होते. दरम्यान, महाराष्ट्रात 23 नोव्हेंबर पासून नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरु होणार आहेत. महाराष्ट्र सरकारने त्यांसंबधी एसओपी जारी केली आहे.

खासगी सुरक्षारक्षकांना परवानगी

भारतीय रेल्वे विभागाने आता मुंबईतील खासगी सुरक्षारक्षकांना देखील लोकल प्रवासाला काही दिवसांपूर्वी परवानगी दिली आहे. राज्य सरकारने केलेल्या विनंतीनंतर रेल्वे विभागाने हा निर्णय घेतला. लोकलने प्रवास करण्यासाठी संबंधित खासगी सुरक्षारक्षकांना गणवेशात यावं लागणार आहे. तसेच आपलं मान्यताप्राप्त ओळखपत्र देखील दाखवावं लागणार आहे

सर्वसामान्यांना प्रतीक्षा करावी लागणार

सर्वसामान्यांसाठीही मुंबई लोकल सुरु करण्याबाबत चाचपणी करण्यासाठी राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहिले होते. दिवसभरात तीन टप्प्यांत सर्वसामान्य प्रवाशांना लोकलमधून प्रवासाची मुभा देण्याची मागणी पत्रातून करण्यात आली होती.

लोकल सुरू केल्यास सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं कठिण होणार आहे. त्याशिवाय लोकल सुरू केल्यास रेल्वे फलाटावर होणारी गर्दी घातक ठरेल, असा धोक्याचा इशारा मध्य रेल्वेने राज्य सरकारला लिहिलेल्या पत्राला देत रेड सिग्नल दाखवला आहे.

संबंधित बातम्या :

लोकल ट्रेन सुरु करण्याबाबत सरकारच्या हालचाली, ठाकरे सरकार मुंबईकरांना दिवाळी गिफ्ट देणार?

लोकल सुरू केल्यास फ्लॅटफार्मवरील गर्दी घातक ठरेल; मध्य रेल्वेचा राज्य सरकारला इशारा

(Railway  granted permission  to school teachers & other non-teaching staff of schools to travel by suburban train services)

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र….

उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!