लोकल ट्रेन सुरु करण्याबाबत सरकारच्या हालचाली, ठाकरे सरकार मुंबईकरांना दिवाळी गिफ्ट देणार?

मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल ट्रेन लवकरच रुळावर येण्याची शक्यता आहे (Vijay Wadettiwar on Mumbai local train).

लोकल ट्रेन सुरु करण्याबाबत सरकारच्या हालचाली, ठाकरे सरकार मुंबईकरांना दिवाळी गिफ्ट देणार?

मुंबई : ठाकरे सरकार मुंबईकरांना दिवाळीचं गिफ्ट देण्याची शक्यता आहे. मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल ट्रेन लवकरच रुळावर येण्याची शक्यता आहे. लोकल ट्रेन सुरु करण्याबाबत सरकारच्या हालचाली सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे (Vijay Wadettiwar on Mumbai local train).

राज्याचे मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना ट्विटरवर एका प्रवाशाने याबाबत एक प्रश्न विचारला. त्या प्रश्नाला वडेट्टीवार यांनी उत्तर दिलं. लवकरच लोकल सुरु करण्याबाबत निर्णय घेऊ, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे मुंबई लोकल ट्रेन सुरु करण्यासाठी सरकार कामाला लागलं असल्याची शक्यता वर्तवली जात आहे (Vijay Wadettiwar on Mumbai local train).

“आम्ही लवकरच येत्या काही दिवसांत लोकल ट्रेन सुरु करण्याचा निर्णय घेऊ. याबाबत आमची चर्चा सुरु आहे. आम्ही लवकरच मुंबईकरांना दिलासा देऊ”, असं विजय वडेट्टीवर ट्विटरवर म्हणाले आहेत.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन बंद आहे. सरकार अनलॉकच्या माध्यमातून लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल ट्रेन प्रवाशाची सेवा सुरु करण्यात आली. त्यानंतर गेल्या आठवड्यात सरकारकडून सर्व महिलांसाठी रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.

दरम्यान, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता अनेक सामान्य लोकांना कार्यालय गाठण्यासाठी रस्ते वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र, यामुळे रस्ते वाहतुकीवर प्रचंड ताण येताना दिसत आहे. रस्त्यावरील खड्डे आणि वाहतूक कोंडी यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे लोकल ट्रेन लवकरात लवकर सुरु व्हाव्यात, अशी सामान्य लोकांची मागणी आहे. तेव्हा आता राज्य सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : लॉकडाऊनमुळे अपघातात मोठी घट, गेल्या 15 वर्षात सर्वात कमी नोंद

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *