“आनंदराव अडसूळांची केस दाबण्याचा प्रयत्न”, कागदपत्र घेऊन रवी राणा ED कार्यालयात

| Updated on: Jan 05, 2021 | 7:09 PM

"आंनदराव अडसूळ यांनी सिटी को-ऑप बँकेत जो घोटळा केलाय, त्याबाबत कागदपत्रे ईडीला दिली आहेत", असं रवी राणांनी सांगितले.(Ravi Rana Anandrao Adsul)

आनंदराव अडसूळांची केस दाबण्याचा प्रयत्न, कागदपत्र घेऊन रवी राणा ED कार्यालयात
रवी राणा, आनंदराव अडसूळ
Follow us on

मुंबई: बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी शिवसेना नेते आणि अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांच्या विरोधात ईडी कार्यालयात (ED) कागदपत्रं सादर केली आहेत. ” ईडी कार्यालयात स्वत:हून आलो असून आंनदराव अडसूळ यांनी सिटी को-ऑप बँकेत जो घोटळा केलाय, त्याबाबत कागदपत्रे ईडीला दिली आहेत”, असं रवी राणांनी सांगितले. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज सकाळीच पत्रकार परिषद घेत सिटी को-ऑप बँकेतील घोटाळ्यावरुन आनंदराव अडसूळ यांच्यावर आरोप केले होते. ( Ravi Rana said Ed will take action against Anandrao Adsul in City Co-Op Bank Case)

काय म्हणाले रवी राणा?

सिटी को-ऑप बँकेच्या मुंबईमध्ये 13-14 शाखा आहेत. या बँकेत 900 खातेदार आहेत. ही बँक बुडण्यास अनधिकृतरित्या वाटलेली कर्ज कारणीभूत असल्याचा आरोप रवी राणांनी केला. आनंदराव अडसूळांनी बँकेची प्रॉपर्टी भाड्यानं दिली. आता खातेदारांना केवळ 1 हजार एवढी रक्कम मिळत आहे. मराठी मतांवर राजकारण करणाऱ्यांनीच मराठी लोकांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप रवी राणांनी केला.

ईडी अडसूळ यांच्यावर कारवाई करेल,राणांना विश्वास

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांवर कारवाई करणार का ?, असा सवाल रवी राणांनी विचारला आहे. सरकार आनंदराव अडसूळ यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. अडसूळ यांची केस दाबण्याचा प्रयत्न होतोत, असा आरोप रवी राणांनी केला. मात्र, ईडीकडून अडसूळ यांच्यावर कारवाई होईल, अशी अपेक्षा आहे, असं रवी राणा म्हणाले.

किरीट सोमय्यांचा अडसूळ यांच्यावर निशाणा

सिटी को ऑपरेटिव्ह बँक घोटाळाप्रकरणी शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. “बॅंकिंग क्षेत्रात जे खूप मोठ्या बाता करतात, त्यांच्याकडे पीएमसी बँकेचे पैसे पोहोचले आहेत. काही महिन्यांपूर्वी सिटी बॅंकेचे गुंतवणूकदार आले होते, आनंदराव अडसूळ यांचा विषय पुढे लावून धरणार. पीएमसी बॅंक असो किंवा सिटी बॅंक, दोषींवर कारवाई होणार” असा इशारा सोमय्यांनी दिला. आनंदराव अडसूळांबद्दल आम्ही रिझर्व्ह बॅंकेला कळवणार आहोत, असंही सोमय्या यावेळी म्हणाले.

संबंधित बातम्या:

किरीट सोमय्यांचा मोठा आरोप, शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ ED च्या रडारवर

संजय राऊतांनंतर शिवसेनेचा आणखी एक नेता ‘ईडी’च्या रडारवर

( Ravi Rana said Ed will take action against Anandrao Adsul in City Co-Op Bank Case)