एलटीटी येथे अलिशान प्रतिक्षागृह, एसी वेटिंगरूम मध्ये 10 रूपयांत विश्रांती

| Updated on: May 28, 2022 | 9:56 AM

लोकमान्य टिळक टर्मिनस वेटींग रूमचे नूतनीकरण करण्यात आले आहे. प्रवाशांसाठी आलिशान प्रतिक्षागृह बनविण्यात आले आहे.

एलटीटी येथे अलिशान प्रतिक्षागृह, एसी वेटिंगरूम मध्ये 10 रूपयांत विश्रांती
Follow us on

दहा रुपयांत ठंडा ठंडा कूल कूल विश्रांती

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपाठोपाठ आता मध्य रेल्वेवरील (central railway) लोकमान्य टिळक टर्मिनस (Ltt)  येथे रेल्वे प्रवाशांसाठी विमानतळाच्या धर्तीवर आलिशान प्रतिक्षागृह बनविण्यात आले आहे. याप्रतिक्षा गृहात अवघ्या दहा रुपयांत वातानुकूलित दालनात आराम करता येणार आहे. तर सध्या दालनात पुरुष व महिला प्रवाशांना मोफत थांबता येणार आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हीजनचे लोकमान्य टिळक टर्मिनस वेटींग रूमचे नूतनीकरण, संचालन, देखभाल आणि हस्तांतर अशा पीपीपी तत्वांवर पाच वर्षकरिता सुमारे 60 कोटींचे कंत्राट काढले आहे. त्यामुळे लांब पल्याच्या मेल एक्सप्रेसच्या प्रवाशांना विमानतळासारख्या सोयी सुविधा मिळणार आहेत. या चकचक प्रतीक्षागृहामुळे रेल्वेची दरवर्षी 20 लाख रपये अशी पाच वर्षात एक कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे.

काय सुविधा असणार

  • सोफा सीटिंग, कॅफे सीटिंग एरिया
  • वेंटिंग रुमच्या आत कॅटरिंगची सुविधा
  • टॉयलेट व बाथरूम, तसंच गरम पाण्याची सोय
  • लगेज संभाळून ठेवायच व्यवस्था
  • मोबाईल चार्जिंगचे पॉइंट
  • अत्यंत आरामदायी खुर्च्या