AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘फरार गुप्ता बंधूंशी उद्धव ठाकरेंचे व्यावसायिक संबंध?’, संजय निरुपम यांचा धक्कादायक दावा

"दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरे अजय गुप्ताला भेटले का?", असा सवाल संजय निरुपम यांनी केला. "अजय गुप्ता बिझनेसमन आणि कुख्यात गुंड आहे. बाबा सहानी यांच्या आत्महत्येतील आरोपीशी उद्धव ठाकरे यांचा व्यावसायिक संबंध असण्याची शक्यता आहे", असं संजय निरुपम म्हणाले.

'फरार गुप्ता बंधूंशी उद्धव ठाकरेंचे व्यावसायिक संबंध?', संजय निरुपम यांचा धक्कादायक दावा
संजय निरुपम आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो
| Updated on: Aug 12, 2024 | 5:46 PM
Share

“देहरादूनमधील एका बिल्डरच्या हत्येतील आरोपी आणि आफ्रिकेतील घोटाळेबाज व्यापारी गुप्ता बंधूंशी उद्धव ठाकरे यांचे कोणते व्यावसायिक संबंध आहेत?”, असा सवाल शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी केला. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. “खासदार संजय राऊत यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानी ७ ऑगस्ट २०२४ ला संध्याकाळी उद्धव ठाकरेंनी गुप्ता बंधूंपैकी एकाची भेट घेतली. याबाबत संजय राऊत यांच्या घरातील सीसीटीव्ही तपासणे आवश्यक आहे. उबाठा जेव्हा दिल्लीत जातात तेव्हा हॉटेल ताज किंवा मौर्य हॉटेलमध्ये वास्तव्य करतात. पण यावेळी ते संजय राऊत यांच्या शासकीय निवासस्थानी का थांबले होते?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

“दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरे अजय गुप्ताला भेटले का?”, असा सवाल संजय निरुपम यांनी केला. “अजय गुप्ता बिझनेसमन आणि कुख्यात गुंड आहे. बाबा सहानी यांच्या आत्महत्येतील आरोपीशी उद्धव ठाकरे यांचा व्यावसायिक संबंध असण्याची शक्यता आहे”, असं निरुपम म्हणाले. त्याचबरोबर “उबाठाला नुकताच निवडणूक आयोगाने देणगी स्वीकारण्यास परवानगी दिली, मग गुप्तासोबत भेट ही निवडणूक निधीसाठी होती का?”, असा प्रश्न निरुपम यांनी विचारला.

“उद्धव ठाकरे आणि कुंटुंबियांची परदेशात मोठी गुंतवणूक आहे असे कळते. लंडनला घर, इतर मोठी हॉटेल्स आहेत. आफ्रिकेत देखील उद्धव ठाकरे यांची गुंतवणूक आहे का? या गुंतवणुकीत गुप्ता बंधूंची भागिदारी आहे क ? याचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी द्यायला हवे”, असं संजय निरुपम म्हणाले. “संजय राऊत बिल्डरांशी दलाली करण्यात कुख्यात आहेत. पत्रा चाळ घोटाळ्यात त्यांनी बिल्डरांकडून मोठी दलाली मिळवली. यासाठी राऊत यांना तुरुंगात जावे लागले होते. त्यामुळे बाबा सहानीसोबत किंवा गुप्ता बंधूंबरोबर राऊत यांचे काही संबंध आहेत का? याचीही चौकशी होणे आवश्यक आहे”, अशी टीका संजय निरुपम यांनी केली.

संजय निरुपम गुप्ता बंधूंबद्दल काय म्हणाले?

“राजेश गुप्ता, अतुल गुप्ता आणि अजय गुप्ता हे उत्तराखंडमधील सहारनपूर येथील रहिवाशी आहेत. ते १९९२ मध्ये दक्षिण आफ्रिकेत व्यापारानिमित्त गेले आणि तिथेच एक भ्रष्ट आणि कुविख्यात व्यापारी बनले. आफ्रिकेचे तत्कालीन राष्ट्रपती जेकब झुमादेखील गुप्ता यांचे बिझनेस पार्टनर होते. २०१८ मध्ये गुप्ता बंधूंचे घोटाळे उघड झाले. दक्षिण आफ्रिका सरकारमधील विविध खात्यांमधून प्रचंड फायदा उचलला. यानंतर जेकब झुमा यांची सरकारमधून हकालपट्टी झाली. या घोटाळ्यांनंतर फरार झालेल्या तिन्ही गुप्ता बंधूंविरोधात नवीन सरकारने इंटरपोलची रेडकॉर्नर नोटीस जारी केली होती. या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार अजय गुप्ता यांनी नव्या सरकारशी चर्चा करुन या घोटाळ्यातून आपले नाव कमी करुन घेतले. राजेश गुप्ता आणि अतुल गुप्ता दोघेही फरार असून अजय गुप्ता मात्र मुंबईत वास्तव्य करत आहेत”, असा दावा संजय निरुपम यांनी केला.

“अजय गुप्ता आणि अतुल गुप्ता हे देहरादून येथील सचिंदरसिंग सहानी (बाबा सहानी) यांच्या हत्येप्रकरणी आरोपी असून ते सध्या जामिनावर आहेत. सहानी हे १५०० कोटींचे डेहराडूनमध्ये मोठे कॉम्प्लेक्स तयार करत होते. मात्र त्यांना पैशांची चणचण होती. २४ मे ला बाबा सहानी यांनी इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. यावेळी त्यांच्याजवळ सापडलेल्या चिठ्ठीत गुप्ता बंधूंची नावे होती. तत्पूर्वी बाबा सहानी यांनी १६ मे ला देहरादून पोलीसांना पत्र लिहून गुप्ता बंधूंपासून धोका असल्याची तक्रार केली होती”, असे निरुपम म्हणाले.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.