त्यांचे इंद्रिये ठिकाण्यावर आहेत ना? संजय राऊत यांचा रिजीम चेंजवरून हल्ला

ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी 'रिजीम चेंज' मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. लोकशाहीत 'रिजीम चेंज' नैसर्गिक आहे, असे सांगत राऊत यांनी भाजपच्या स्थापनेपासूनच्या इतिहासाचे दाखले दिले. फडणवीसांचे राजकीय ज्ञान कमी असल्याचे आणि त्यांची 'इंद्रिये ठिकाण्यावर आहेत ना?' असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.

त्यांचे इंद्रिये ठिकाण्यावर आहेत ना? संजय राऊत यांचा रिजीम चेंजवरून हल्ला
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 17, 2026 | 10:48 AM

रिजीम चेंजच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. मनमोहन सिंग सरकार असताना तुम्ही जी आंदोलने केली ती रिजीम चेंजसाठी नव्हती काय? भाजपची स्थापना ही रिजीम चेंजसाठी नव्हती काय? असा सवाल करतानाच जगात जी जी आंदोलने होतात ती रिजीम चेंजसाठीच असतात. लोकशाहीत रिजीम चेंज होतच असते. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजकीय ज्ञानाचा दुष्काळ आहे. फडणवीस यांचा अभ्यास कच्चा आहे. त्यांची इंद्रिये ठिकाण्यावर आहेत ना? असा हल्लाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी चढवला आहे. मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत यांनी हा हल्ला चढवला.

ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी रिजीम चेंजचं केलेलं विधान हे लोकशाहीला धरून केलेलं आहे. भूषण कशाला? आम्ही सर्वच बोलत आहोत. मुख्यमंत्र्यांचे इंद्रिये ठिकाणावर आहेत ना? आम्ही सर्व रस्त्यावर उतरलो आहोत. तुम्ही गैरमार्गाने सत्तेवर आला. तुम्ही घटनाबाह्य पद्धतीने सत्तेवर आला. एकनाथ शिंदे घटनाबाह्य पद्धतीने मुख्यमंत्री झाले आणि आता उपमुख्यमंत्री झाले. त्याविरोधात आम्ही लढत आहोत. लोकशाहीत प्रत्येक विरोधक रिजीम चेंजसाठी आंदोलन करत असतो. मनमनोह सिंग असताना तुम्ही कशासााठी आंदोलन करत होता? रिजीम चेंजसाठीच ना? तुम्ही भाजपची स्थापना कशासाठी केली? रिजीम चेंजसाठीच ना? व्ही पी सिंग यांना पाठिंबा तुम्ही रिजीम चेंजसाठीच दिला ना? आपल्या मुख्यमंत्र्यांना राजकीय ज्ञानाचा दुष्काळ आहे. भाजपच्या मानसिकतेत तो दुष्काळ आहे. जगात जी आंदोलनं होतात, ती रिजीम चेंजसाठीच होतात. भाजप आणि जनसंघाने केलेले आंदोलन हे रिजीम चेंजसाठीच होतं. तुम्हाला वेळ असेल तर आमच्यासोबत बसा. मी तुम्हाला इतिहासाचे धडे देईन, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

Loading...

रिजीम चेंज झालंच पाहिजे

निवडणूक आयोगाला हाताशी धरून चुकीच्या पद्धतीने निवडणुका जिंकल्या असतील तर रिजीम चेंज झालं पाहिजे. बांगलादेशच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना लोकांनी रस्त्यावर उतरून मारलं. त्याने ज्ञानेश कुमारप्रमाणेच सत्ताधाऱ्यांना निवडणूक जिंकून दिल्या. याला जनतेचं बंड म्हणतात. नेपाळमध्ये सरकारच्या भ्रष्टाचारामुळे लोक रस्त्यावर आले. श्रीलंकेतही तेच झालं. प्रत्येक ठिकाणी निवडणूक आयोग केंद्र बिंदू होता. फडणवीसांना हे माहीत नाही. त्यांचा अभ्यास कच्चा आहे, अशी टीका राऊत यांनी केली.

दिमागी नक्षली म्हटलं तरी चालेल

या देशात मोदी आणि शाह तिरंगा फडकवण्यासाठी अटक करत असतील तर रिजीम चेंज झालंच पाहिजे. ताबडतोब रिजीम चेंज झालं पाहिजे. ब्रिटिशींनी तिरंग्याला विरोध केला. आम्ही रिजीम चेंज केलं. संघाने 52 वर्ष त्यांच्या कार्यालयावर तिरंगा फडकवला नाही. तुमचा तिरंग्यावरील राग समजू शकतो. रिजीम चेंज केलं नाही तर देश माफ करणार नाही. जे तिरंग्याला विरोध करतात त्यांच्या हातात राज्य असेल तर हे राज्य उलथवून टाकलं पाहिजे. रिजीम चेंज हा चांगला शब्द आहे. मला दिमागी नक्षली म्हटलं तरी चालेल, असंही ते म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us