AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्ली पोलिसांकडून अभिजीत दीपके किडनॅप? सीजेपीच्या आरोपाने देशात खळबळ

कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दीपके यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 'लहरा दो तिरंगा' आंदोलनादरम्यान ही कारवाई झाली. मात्र, CJP ने पोलिसांवर दीपकेचे 'किडनॅपिंग' केल्याचा गंभीर आरोप केला आहे, ज्यामुळे देशात खळबळ उडाली आहे.

दिल्ली पोलिसांकडून अभिजीत दीपके किडनॅप? सीजेपीच्या आरोपाने देशात खळबळ
Abhijeet DipkeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 17, 2026 | 10:13 AM
Share

कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दीपके यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्ली पोलिसांनी दीपके यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे. दीपके यांनी लहरा दो तिरंगा हे आंदोलन छेडलं होतं. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. दिल्ली पोलिसांनी दीपकेंविरोधात कोणते गुन्हे दाखल केले? आता पोलिसांचं पुढचं पाऊल काय असणार आहे? याबाबतची संपूर्ण माहिती समोर आली आहे. तर दिल्ली पोलिसांनी दीपकेंना किडनॅप केल्याचा आरोप सीजेपीने केला आहे. त्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे.

एएनआयच्या दाव्यानुसार, अभिजीत दीपके यांच्यावर बीएनएसएसच्या कलम 126/170 अंतर्गत कारवाई सुरू करण्यात आली आहे. शांततेचा भंग किंवा शांतता बिघडण्याची शक्यता म्हणून हे कलम लावण्यात आले आहेत. दिल्ली पोलीस आता दीपकेंना आज एसईएम कोर्टात हजर करणार आहे. विशेष म्हणजे, एक वर्षभर शांतता भंग करणार नाही, या अटीवर कोर्टाने मागच्यावेळी दीपकेंना सोडलं होतं. त्यामुळे आता कोर्ट काय निर्णय देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पोलिसांनी काय म्हटलं?

16 ऑक्टोबरच्या संध्याकाळी AISAची राष्ट्रीय अध्यक्ष नेहा बोरा आणि कार्यकर्ते अभिजीत दीपके यांना संबंधित कलमांतर्गत ताब्यात घेण्यात आलं आहे. दिल्ली पोलीस अधिनियमांच्या कलम 65 अंतर्गत औपचारिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नेहा बोराला सोडून देण्यात आलं आहे. तर दीपकेंच्या विरोधात BNSS च्या कलम 126/170 अंतर्गत कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे, असं दिल्ली पोलिसांनी सांगितलं.

सीजेपीचा आरोप काय?

यावेळी सीजेपीने दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. अभिजीत दीपके हे आंदोलनाच्या ठिकाणी जाण्यापूर्वी घराच्या बाहेर फेरफटका मारत असताना त्यांना ताब्यात घेतलं आहे. दिल्ली पोलिसांनी त्यांना किडनॅप केलं आहे, असं सीजेपीने म्हटलं आहे. दिल्ली पोलीस दीपकेंना अज्ञात स्थळी घेऊन गेली आहे. आमचा त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. त्यांना वकिलांशी बोलण्याचीही परवानगी दिली जात नसल्याचं सीजेपीने एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Follow Us
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?