AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मतदार यादीवर आक्षेप घेताच संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; काय घडतंय?

ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी मतदार याद्या आणि एसआरए घोटाळ्यावर आक्षेप घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी गेले आहेत. भाजपवर गंभीर आरोप करत, राऊत यांनी एसआरएद्वारे मतदार याद्यांमध्ये फेरफार करण्याचा कट उघड केला. राज ठाकरे यांनीही एसआरएवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने या भेटीत राज्यातील राजकीय परिस्थिती आणि मतदार यादीतील संभाव्य गैरव्यवहारांवर महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

मतदार यादीवर आक्षेप घेताच संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; काय घडतंय?
Sanjay raut Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 31, 2026 | 12:00 PM
Share

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मतदार याद्यांवर आक्षेप घेतला आहे. हा आक्षेप घेतल्यानंतर संजय राऊत हे थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये मतदार याद्यांवर चर्चा होणार असल्याचं सांगतिलं जात आहे. तसेच इतर राजकीय विषयांवरही या दोन्ही नेत्यांकडे चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात असून या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भेटीनंतर राऊत काय प्रतिक्रिया देतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

संजय राऊत यांनी एसआयआरच्या घोटाळ्यावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता. नवी मुंबईतील भाजपच्या कार्यालयातून एसआरएचे ड्युप्लिकेट फॉर्म भरले जात होते. आपल्याला हवे असलेले मतदार एसआयआरच्या माध्यमातून ठेवायचे हा भाजपचा छुपा अजेंडा आहे. जे मतदार त्यांच्या विरोधात मतदान करू शकतात, अशा समाजातील लोकं यादीतून वगळायचे काम सुरू आहे. त्यामुळे एसआयआरच्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. भाजप जिंकण्यासाठी नवीन नवीन फंडे आणत असतो. कधी ईव्हीएम घोटाळे, कधी पैशाचे वाटप, कधी मतदार यादीत घोटाळे, आता एसआयआर आणलं आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता.

ठाकरे भेटीत काय चर्चा?

राऊत यांनी एसआयआर आणि मतदार यादीवर आक्षेप घेतल्यानंतर लगेचच राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आले आहेत. राज ठाकरे यांच्याशी त्यांची एसआयआरवर चर्चा होणार असल्याची चर्चा आहे. राज ठाकरे यांनीही एसआयआरच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे या भेटीत काय ठरतं? काय निर्णय होतो? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच या भेटीत दोन्ही नेते राज्यातील राजकीय परिस्थितीवरही चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या भेटीत कशा कशावर चर्चा होते? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर संजय राऊत हे मीडियासी संवाद साधण्याची शक्यता आहे. त्यामुळे राऊत या भेटीबाबत काय माहिती देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक