AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे हालचालींना वेग, शरद पवार आणि हितेंद्र ठाकूर यांची भेट, काय घडतंय?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हितेंद्र ठाकूर यांनी शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली आहे. मुंबईत ही भेट झाली आहे. या भेटीमागे आगामी विधान परिषद निवडणुकीसाठीचं राजकारण असल्याचं म्हटलं जात आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे हालचालींना वेग, शरद पवार आणि हितेंद्र ठाकूर यांची भेट, काय घडतंय?
| Edited By: Chetan Patil | Updated on: Jul 08, 2024 | 5:54 PM
Share

बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर हितेंद्र ठाकूर यांनी ही भेट घेतल्याची शक्यता आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाकडे 3 आमदारांचे संख्याबळ आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलैला मतदान होणार आहे. या निवडणुकीत भाजपने 1 उमेदवार जास्त दिल्याने चुरस वाढली आहे. बहुजन विकास आघाडीने याआधीच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिला होता. पण यावेळी हितेंद्र ठाकूर आणि शरद पवार यांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हितेंद्र ठाकूर यांनी शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली आहे. मुंबईत ही भेट झाली आहे. या भेटीमागे आगामी विधान परिषद निवडणुकीसाठीचं राजकारण असल्याचं म्हटलं जात आहे. शरद पवार गटाने विधान परिषद निवडणुकीत शेकाप नेते जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे. जयंत पाटील हे शरद पवार गटाचे पुरस्कृत उमेदवार आहेत.

विधान परिषदेच्या निवडणुकीत चुरस

शरद पवार गटाकडील मते महत्त्वाची आहेत. खरंतर ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रचंड प्रयत्न करण्यात आले. पण भाजपने एक जास्त उमेदवार दिल्याने या निवडणुकीत आता चुरस बघायला मिळत आहे. या निवडणुकीत प्रत्येक पक्ष आपल्याकडे मतं खेचण्यासाठी प्रयत्न करेल. शेकाप नेते जयंत पाटील यांना शरद पवार गटाच्या आमदारांची मते जातील. पण तरीही त्यांना बऱ्याच मतांची आवश्यकता आहे. हितेंद्र ठाकूर यांच्याकडे 3 मतांची ताकद आहे. त्यामुळे हितेंद्र ठाकूर यांनी जयंत पाटील यांना मतदान केलं तर त्यांना जिंकून येण्यास मदत होऊ शकते.

हितेंद्र ठाकूर आणि शरद पवार यांचे जुने मैत्रीपूर्ण संबंध राहिलेले आहेत. त्यामुळे या मैत्रीचा या निवडणुकीत शरद पवार गटाला फायदा होतो का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, मतांची जुळवाजुळव करण्यासाठी शरद पवार आणि हितेंद्र ठाकूर यांची बैठक झाल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीनंतर हितेंद्र ठाकूर हे शेकापचे जयंत पाटील यांना मतदान करु शकतात, अशी चर्चा आहे.

Follow Us
मोठी बातमी! सोनम वांगचुक यांच्याबाबत कोर्टाचा मोठा निर्णय;
मोठी बातमी! सोनम वांगचुक यांच्याबाबत कोर्टाचा मोठा निर्णय; डॉक्टारांचं पॅनल तयार करणार अन्...
भारत-अमेरिका FTA विरोधात पंजाबच्या शेतकऱ्यांचा एल्गार! शंभू सीमेवर...
भारत-अमेरिका FTA विरोधात पंजाबच्या शेतकऱ्यांचा एल्गार! शंभू सीमेवर कडेकोट बंदोबस्त, पहा व्हिडीओ
जास्त तेल ओताल तर सरकार जळून खाक होईल; संजय राऊतांची प्रतिक्रिया
Sanjay Raut | जास्त तेल ओताल तर सरकार जळून खाक होईल; जंतर-मंतरवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
मोठी घोषणा! उद्या जाहीर होणार कर्जमाफीच्या शेतकऱ्यांची पहिली यादी
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! उद्या जाहीर होणार कर्जमाफीच्या पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी
दिल्लीत मोठ्या घडमोडी! इकडे मंत्री जे. पी. नड्डांकडून आंदोलकांशी चर्चा
दिल्लीत मोठ्या घडमोडी! इकडे मंत्री जे. पी. नड्डांकडून आंदोलकांशी चर्चा, तिकडे विरोधी पक्ष नेते थेट...
मतं घेताना लाज वाटली नाही का? खोतांना आंदोलनकर्त्यांचा थेट सवाल
New Delhi CJP Protest | मतं घेताना लाज वाटली नाही का? सदाभाऊ खोतांना आंदोलनकर्त्यांचा थेट सवाल
सर्वत्र खळबळ! दिल्लीतील CJP च्या आंदोलनाबाबत राहुल गांधीचं विधान
त्या' एका विधानाने सर्वत्र खळबळ! दिल्लीतील CJP च्या आंदोलनाबाबत राहुल गांधी स्पष्टच म्हणाले
आंदोलक म्हणजे आतंकवादी! खोतांच्या वादग्रस्त वक्तव्याने राजकारण तापलं
Sadabhau Khot | आंदोलक म्हणजे आतंकवादी! सदाभाऊ खोतांच्या वादग्रस्त वक्तव्याने राजकारण तापलं
दिल्लीतील CJP च्या आंदोलनाबाबत CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीतील CJP च्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, आंदोलनांसारख्या संवेदनशील...
ठाकरे गटाचा मोठा डाव! सर्व फुटीर खासदारांना कोर्टात ओढणार, नेमकं काय..
ठाकरे गटाचा मोठा डाव! सर्व फुटीर खासदारांना कोर्टात ओढणार, नेमकं काय घडलं?
राहुल गांधी, प्रियंका गांधी घेणार अभिजित दीपकेंची भेट, मोदींच्या निवासस्थानापुढेच ठिय्या!.

राहुल गांधी, प्रियंका गांधी घेणार अभिजित दीपकेंची भेट, मोदींच्या निवासस्थानापुढेच ठिय्या!

आमची मुलं काय दहशतवादी आहेत का? अभिजीत दिपकेंच्या आईचा संताप, पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाल्या?.

आमची मुलं काय दहशतवादी आहेत का? अभिजीत दिपकेंच्या आईचा संताप, पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाल्या?

CJP Delhi Protest : दिल्ली पोलिसांना ‘मारो मारो’ म्हणणारा तरूण तर नागपूरचा, सांगितलं आंदोलनात नेमकं काय घडलं?.

CJP Delhi Protest : दिल्ली पोलिसांना ‘मारो मारो’ म्हणणारा तरूण तर नागपूरचा, सांगितलं आंदोलनात नेमकं काय घडलं?

IND vs ZIM: मॅचच्या 48 तासआधी झिम्बाब्वेकडून टीम इंडियाला ओपन चॅलेंज, कॅप्टन सिकंदर रझाने दाखवला माज; Video Viral.

IND vs ZIM: मॅचच्या 48 तासआधी झिम्बाब्वेकडून टीम इंडियाला ओपन चॅलेंज, कॅप्टन सिकंदर रझाने दाखवला माज; Video Viral

Karale Guruji : अपोजिशनला तुम्हाला लाजा शरमा नाहीत का? कॅमेऱ्यासमोर नितेश कराळे गुरुजींनी काँग्रेसच्या बड्या नेत्याला मजबूत झापलं.

Karale Guruji : अपोजिशनला तुम्हाला लाजा शरमा नाहीत का? कॅमेऱ्यासमोर नितेश कराळे गुरुजींनी काँग्रेसच्या बड्या नेत्याला मजबूत झापलं

Dharmendra Pradhan: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान स्वत: किती शिकले?.

Dharmendra Pradhan: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान स्वत: किती शिकले?