AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा सुरु असताना ‘मातोश्री’वर महत्वाची बैठक

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरु असताना मातोश्रीवर शिवसेना उबाठा नेत्यांची बैठक सुरु झाली आहे. या बैठकीसाठी संजय राऊत, विनायक राऊत इतर नेते मंडळी दाखल झाली आहे. त्यामुळे या बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा सुरु असताना 'मातोश्री'वर महत्वाची बैठक
उद्धव ठाकरेImage Credit source: TV 9 Marathi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 08, 2025 | 1:04 PM
Share

राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याचा दावा केला जात आहे. शिवसेना उबाठा नेते संजय राऊत रोखठोकपणे ही भूमिका मांडत आहेत. त्याला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडून अप्रत्यक्ष दुजोरा दिला जात आहे. या घटनांचा पार्श्वभूमीवर मातोश्रीवर रविवारी महत्वाची बैठक सुरु झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित होत असलेल्या या बैठकीसाठी महत्वाचे नेते दाखल झाले आहेत.

मातोश्रीवर शिवसेना उबाठा नेत्यांची बैठक सुरु झाली आहे. या बैठकीसाठी संजय राऊत, विनायक राऊत इतर नेते मंडळी दाखल झाली आहे. मुंबईतील निरीक्षक आणि उपनेत्यांनाही या बैठकीला बोलवले आहे. यापूर्वी झालेल्या बैठकीत निरीक्षकांना संपूर्ण मुंबई मनपा निवडणुकीसंदर्भात आढावा घेण्याचे सांगितले होते. त्यासंदर्भातील अहवाल निरीक्षक बैठकीत मांडणार आहे. त्यामुळे मुंबई मनपा निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात, अशी शक्यता आहे.

राज ठाकरे यांच्याकडून सुरुवात

ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा राज ठाकरे यांनी सुरु केली. महेश मांजरेकर यांनी काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची मुलाखती घेतली होती. या मुलाखतीमध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र येऊ शकता का? असा प्रश्न विचारला होता. त्याला सकारात्मक उत्तर राज ठाकरे यांनी दिले होते. ते म्हणाले होते की, महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी वाद ही शुल्लक गोष्ट आहे. त्यामुळे एकत्र येणे यामध्ये मला कठीण गोष्ट वाटत नाही, असे राज म्हणाले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ऑफर स्वीकारण्यास होकार देत भाजप आणि शिवसेनेची साथ सोडण्याची अट टाकली होती.

उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी महाराष्ट्राच्या मनात जे आहे, तेच होणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर शिवसेना उबाठाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्र फोटोही प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानंतर शनिवारी राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना हसत हसत मातोश्रीवर जात असल्याचे म्हटले. पुढच्या क्षणात कौटुंबिक कामासाठी बहिणीकडे जात असल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यामुळे राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा सुरुच आहे.

Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल