शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदाराला ट्रेनमध्ये लुटलं

कल्याण रेल्वे स्टेशनला बुलडाणा जिल्ह्यातील 2 आमदारांच्या साहित्याची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. अन्य एका आमदाराच्या पाठीवरची बॅगही कापली.

शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदाराला ट्रेनमध्ये लुटलं
Follow us
| Updated on: Jun 25, 2019 | 10:10 AM

मुंबई : रेल्वेप्रवासात सर्व सामान्य प्रवाशांच्या सामानाची चोरी झाल्याच्या घटना नेहमीच घडतात. मात्र, त्यावर पोलीस प्रशासन कोणतीही ठोस कारवाई करत नाही. अखेर सामान्य नागरिकही हतबल होऊन चोरीला गेलेले सामान मिळण्याची आशा सोडून देतात. अशावेळी लोकप्रतिनिधीही याकडे ढुंकून बघत नाही की सभागृहात हा प्रश्न उपस्थित करुन यावर उपाय योजनांची मागणी करत नाही. मात्र, आता 2 लोकप्रतिनिधींचेच सामान चोरी झाल्याने मोठा गोंधळ उडाला आहे.

कल्याण रेल्वे स्टेशनला बुलडाणा जिल्ह्यातील 2 आमदारांच्या साहित्याची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. अन्य एका आमदाराच्या पाठीवरची बॅगही कापली. संबंधित आमदारांनी रेल्वे प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसेच याबाबत सीएसटी लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

पावसाळी अधिवेशन  सुरु असल्याने बुलडाणा जिल्ह्यातील चिखली मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे, शिवसेनेचे आमदार संजय रायमूलकर आणि शिवसेनेचे आमदार शशिकांत खेडेकर हे आज सकाळी मुंबईला पोहचले. आमदार बोंद्रे मुंबईला येण्यासाठी काल (24 जून) मलकापूर येथून विदर्भ एक्स्प्रेसमध्ये बसले होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी वृषाली बोंद्रे देखील होत्या. आमदार रायमूलकर आणि  आमदार खेडेकर हे जालनावरुन देवगिरी एक्स्प्रेसने मुंबईला पोहचले.

आमदारांच्या पत्नीची बॅग हिसकावून धूम

आमदार बोंद्रे आज (25 जून) सकाळी 6 ते 7 च्या दरम्यान  कल्याण स्टेशनला उतरणार त्याचवेळी चोरट्याने बोगीत घुसून त्यांच्या पत्नी वृषाली जवळील पर्स हिसकावून धूम ठोकली आणि आमदार बोंद्रे यांच्या महत्त्वाच्या कागदपत्रांची फाईलही पळवली. बोंद्रे यांनी चोरट्याचा पाठलाग  करुन पर्स मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरट्याने हिसका देऊन पळ काढला. पर्समध्ये 26 हजार, एटीएम कार्डसह अन्य साहित्य होते.

दुसरीकडे जालनावरुन देवगिरीने येणारे आमदार रायमूलकर हेही कल्याण स्टेशनला उतरणार असल्याने सकाळी उठले. मात्र, त्यावेळी त्यांचा मोबाईल आणि खिशातील 10 हजार रुपये चोरट्याने चोरल्याचे त्यांच्या लक्षात आले. तसेच बॅगला ब्लेडने कापल्याचेही समोर आले. हा संपूर्ण प्रकार कल्याण ते ठाणे स्टेशन दरम्यान घडल्याचे रायमूलकर यांच्या खासगी सचिवांनी सांगितले.

आमदारांसाठी राखीव असलेल्या बोगीत चोर कसे?

घडलेल्या प्रकाराने या तिन्ही आमदारांनी रेल्वे प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अधिवेशन काळात आमदारांसाठी राखीव असलेल्या बोगीत चोर शिरतातच कसे? आणि रेल्वेतील पोलीस कुठे जातात? असा सवाल या आमदारांनी केला आहे.

Non Stop LIVE Update
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.