PM Modi Interview : ‘जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला काय सांभाळणार’, मोदींचा रोख नेमका कुणावर?

Prime Minister Narendra Modi Exclusive Interview : 'कुटुंबाच्या सत्तेच्या हव्यासापायी बाळासाहेबांचं स्वप्न यांनी का मोडलं. कुटुंबाच्या भल्यासाठी? आपल्या मुलाला इस्टॅब्लिश करण्यासाठी? बाळासाहेबांचा एवढा मोठा वारसा. बाळासाहेबांनी शिवसैनिकांसाठी जीवन अर्पण केलं होतं. त्यांची शिवसेना आज आमच्यासोबत'

PM Modi Interview : 'जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला काय सांभाळणार', मोदींचा रोख नेमका कुणावर?
| Updated on: May 02, 2024 | 10:37 PM

महाराष्ट्रासाठी यंदाची लोकसभा निवडणूक वेगळी असणार आहे, कारण महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये उभी फूट पडली आहे. त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे भावनिक मुद्दा निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच भाजपसमोर महाराष्ट्रात भावनिक मुद्दा मोठं आव्हान असण्याची चर्चाही दबक्या आवाजात सुरू आहे. यावर मोदींच सवाल केल्या असता त्यांनी यावर उत्तर दिलंय. यावेळी मोदींनी विरोधकांवर हल्लाबोलही केलाय. मोदी म्हणाले, ही इमोशनल परिस्थिती युतीच्या बाजूने आहे. कारण बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आमच्यासोबत आहे. अधिकृत राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे. त्यामुळे लोकांना वाटतंय की कुटुंबाच्या सत्तेच्या हव्यासापायी बाळासाहेबांचं स्वप्न यांनी का मोडलं. कुटुंबाच्या भल्यासाठी? आपल्या मुलाला इस्टॅब्लिश करण्यासाठी? बाळासाहेबांचा एवढा मोठा वारसा. बाळासाहेबांनी शिवसैनिकांसाठी जीवन अर्पण केलं होतं. त्यांची शिवसेना आज आमच्यासोबत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मतदार आमच्यासोबत भावनने जोडलेला गेलाय, असे म्हणत मोदी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले

पुढे मोदी असेही म्हणाले,  शरद राव यांच्याबाबत बोलायचं म्हणजे ही राजकीय समस्या नाही. त्यांनी हा कितीही राजकीय मुद्दा बनवला तरी महाराष्ट्रातील जनतेला कसं पटेल. हा त्यांचा कौटुंबीक प्रॉब्लेम आहे. घरातील झगडा आहे. वारसा काम करणाऱ्या मुलाला द्यायचा की मुलगी आहे तर मुलीला द्यायचा. झगडा त्याचा आहे. सिंपथीऐवजी संतापाचं वातावरण आहे की या वयात कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला काय सांभाळणार? असा सवालही मोदींनी यावेळी उपस्थित केलाय.

Follow us
बीड मतदारसंघात घडलंय काय? बूथ कॅप्चरचा कुणाचा आरोप? व्हिडीओ आला समोर
बीड मतदारसंघात घडलंय काय? बूथ कॅप्चरचा कुणाचा आरोप? व्हिडीओ आला समोर.
हे तुम्ही त्यांनाच जाऊन विचारा, दादांवरील प्रश्नावर पवारांचं थेट उत्तर
हे तुम्ही त्यांनाच जाऊन विचारा, दादांवरील प्रश्नावर पवारांचं थेट उत्तर.
विशाल अग्रवालला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी, कोर्टान नोंदवला हा गुन्हा
विशाल अग्रवालला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी, कोर्टान नोंदवला हा गुन्हा.
जीवंत माणसं चिरडली जाताय, कुठय तुमच...रोहित पवार आक्रमक थेट केला सवाल
जीवंत माणसं चिरडली जाताय, कुठय तुमच...रोहित पवार आक्रमक थेट केला सवाल.
मग अमित ठाकरे का नाही? नितेश राणे नेमकं काय म्हणाले?
मग अमित ठाकरे का नाही? नितेश राणे नेमकं काय म्हणाले?.
महायुतीत आहोत याची जाणीव ठेवा; अडसूळांनी भाजप नेत्याला फटकारलं
महायुतीत आहोत याची जाणीव ठेवा; अडसूळांनी भाजप नेत्याला फटकारलं.
लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजलं बिगूल
लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजलं बिगूल.
अपघातवेळी ड्रायव्हिंग सीटवर कोण होत? पोलीस आयुक्तांचा मोठा खुलासा काय?
अपघातवेळी ड्रायव्हिंग सीटवर कोण होत? पोलीस आयुक्तांचा मोठा खुलासा काय?.
पुणे हिट अँड रन केसमध्ये दबाव की दिरंगाई? पोलीस आयुक्तांनी सांगितलं...
पुणे हिट अँड रन केसमध्ये दबाव की दिरंगाई? पोलीस आयुक्तांनी सांगितलं....
दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावले, केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर भरकटलं अन
दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावले, केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर भरकटलं अन.