अंधेरीत भरधाव बेस्टची अनेक वाहनांना धडक, जवळपास १४ गाड्या एकमेकांवर आदळल्या..

अंधेरीत भरधाव बेस्ट बसने अनेक वाहनांना धडक दिल्याची घटना घडली आहे. या घटनेत १३ गाड्यांचे नुकसान झाल्याचे म्हटले जात आहे.

अंधेरीत भरधाव बेस्टची अनेक वाहनांना धडक, जवळपास १४ गाड्या एकमेकांवर आदळल्या..
andheri best bus accident
| Updated on: Jul 10, 2026 | 6:22 PM

अंधेरीत बेस्टच्या भरधाव बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने या बसने १४ गाड्यांना धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात १२ ते १३ रिक्षांचे नुकसान झाले आहे. या घटनेत दोन ते तीन जण जखमी झाल्याचे वृत्त असून त्यांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अंधेरी स्थानक पश्चिम बेस्ट बस क्रमांक २४२ या मार्गावरील बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने या बसने अंधेरी येथील १४ गाड्यांना धडक दिल्याने अनेक जण यात जखमी झाल्याचे म्हटले जात आहे. या घटनेत अनेक रिक्षांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. या बेस्ट चालकाला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेत दोन ते तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. चालकाने बसचे ब्रेस फेल झाल्याचा दावा केला आहे. गेल्या काही महिन्यात बेस्टच्या चालकांच्या चुकीमुळे अनेक अपघात घडले आहेत.

नुकताच भांडुप कोकण नगर येथे बेस्टची मोठी बस रिव्हर्स घेताना एका प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावल्याची घटना घडली होती. प्रवाशांनीच या बसला धक्का मारुन पुढे नेल्याने या पादचारी प्रवाशाचे प्राण सुदैवाने बचावले होते. मंगतराम पेट्रोल पंप येथे रस्ता अरुंद असल्याने येथे मोठ्या आकाराच्या बसना मागे वळवताना अडचण होते अशी तक्रार बसचालकांनी अनेकदा केली आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Follow Us