AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नेतेपदी निवड होताच एकनाथ शिंदे भर स्टेजवर उद्धव ठाकरे यांच्या पाया पडले, ठाकरे गटाचा लाव रे तो व्हिडीओ

2018 च्या कार्यकारिणीच्या प्रतिनिधी सभेमध्ये झालेले ठराव आणि त्याची सर्व कागदपत्रे निवडणूक आयोगाला दिली होती. अध्यक्ष यांनाही दिली होती. तरीही म्हणतात आमच्याकडे तुमचे पुरावे आले नाहीत. यावर अनिल परब यांनी 2018 च्या कार्यकारिणी सभेत काय घडलं? याची सर्विस्तर माहिती दिली.

नेतेपदी निवड होताच एकनाथ शिंदे भर स्टेजवर उद्धव ठाकरे यांच्या पाया पडले, ठाकरे गटाचा लाव रे तो व्हिडीओ
eknath shindeImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Jan 16, 2024 | 10:06 PM
Share

मुंबई | 16 जानेवारी 2024 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाकडून सादर झालेल्या घटनेच्या आधारे आपला निर्णय दिला. निवडणूक आयोगाकडे 1999 ची घटना आहे. त्याचा आधार घेऊन निर्णय दिला असे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले होते. मात्र, जनता न्यायालयात शिवसेना नेते अनिल परब यांनी अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि शिंदे गटाचे सर्व दावे फोल ठरवले. नेतेपदी निवड झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भर स्टेजवर उद्धव ठाकरे यांच्या पाया पडले. त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना गुच्छ देऊन स्वागत केले. अनिल परब यांनी हा व्हिडीओ दाखवत शिंदे गटाला चांगली चपराक लगावली.

2018 च्या कार्यकारिणीच्या प्रतिनिधी सभेमध्ये झालेले ठराव आणि त्याची सर्व कागदपत्रे निवडणूक आयोगाला दिली होती. अध्यक्ष यांनाही दिली होती. तरीही म्हणतात आमच्याकडे तुमचे पुरावे आले नाहीत. यावर अनिल परब यांनी 2018 च्या कार्यकारिणी सभेत काय घडलं? याची सर्विस्तर माहिती दिली.

2018 च्या राष्ट्रीय कार्यकारिणीत उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून फेर निवड झाली. या बैठकीत आदित्य ठाकरे यांची नेते पदी बिनविरोध निवड झाली त्यांच्यासोबत ९ नेते आणि २१ उपनेने यांची निवड झाली. या सर्व प्रस्तावाची पोच देण्यात आली होती असे अनिल परब म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनीच एकनाथ शिंदे यांची नेतेपदी निवड केली होती. त्या प्रतिनिधी सभेत जाहीर केलं होतं. ही सर्व कागदपत्रे निवडणूक आयोगाला दिले होते. राष्ट्रीय कार्यकारिणी १३ सदस्यांची होती. त्याच बैठकीत चंद्रकांत खैरे, अनंत गिते, आनंदराव अडसूळ यांचीही नेतेपदी निवड करण्यात आली होती. नेतेपदी निवड झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भर स्टेजवर उद्धव ठाकरे यांच्या पाया पडले. त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना गुच्छ देऊन स्वागत केले याचा व्हिडीओ अनिल परब यांनी यावेळी दाखविला.

निवडणूक आयोगाने त्यांच्या वेबसाईटवर एक कागद टाकला आहे. त्यात पक्षाचं नाव, पक्षप्रमुख कोण आहे, पुढची निवडणूक कधी आहे, याची माहिती दिली आहे. हा अधिकृत कागद आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे यांना बोलावलं होतं. त्यावर उद्धव ठाकरे यांचं नाव आहे. त्यांना बोलावलं जातं. पक्षाध्यक्ष म्हणतात तरीही म्हणतात तुमचे कागदपत्र नाही. आम्ही पुरावे दिल्याशिवाय तुम्ही बदल केले का? असा सवाल अनिल परब यांनी यावेळी केला.

Follow Us
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, काँग्रेसचा भाजपला टोला; अभिजित वंजारी....
Abhijit Vanjari : शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, काँग्रेसचा भाजपला टोला; अभिजित वंजारींनी सांगितलं युक्तीचं गणित
मोदींचं काँग्रेसवरील ट्वीट फडणवीसांकडून आधी रिट्वीट मग डिलीट; नेमकं...
CM Devendra Fadnavis : मोदींचं काँग्रेसवरील ट्वीट फडणवीसांकडून आधी रिट्वीट मग डिलीट; नेमकं काय घडलं?
मराठवाड्यात शरद पवार गटाने मैदान मारलं; प्रतापसिंह पाटलांचा विजय
Marathwada MLC Election Result : Pratapsinh Patil : मराठवाड्यात शरद पवार गटाने मैदान मारलं; प्रतापसिंह पाटील यांचा दणदणीत विजय
महाराष्ट्रात काँग्रेसनं खातं उघडलं; अभिजित वंजारी यांचा विजय
Congress : महाराष्ट्रात काँग्रेसनं खातं उघडलं; अभिजित वंजारी यांचा विजय
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती