‘एकनाथ शिंदे आनंद दिघे यांचे सच्चे चेले असतील, तर…’, ठाकरे गटाच्या महिला नेत्याचं मुख्यमंत्र्यांना थेट चॅलेंज

| Updated on: Dec 26, 2022 | 11:48 PM

ठाकरे गटाच्या एका महिला नेत्याने राहुल शेवाळे यांच्यावर निशाणा साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट चॅलेंज दिलंय.

एकनाथ शिंदे आनंद दिघे यांचे सच्चे चेले असतील, तर..., ठाकरे गटाच्या महिला नेत्याचं मुख्यमंत्र्यांना थेट चॅलेंज
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

गिरीश गायकवाड, नागपूर : खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे चांगल्यात आक्रमक झाल्या. राहुल शेवाळे यांचं जुम्मा चुम्मा काय होतं? असा खोचक प्रश्न मनिषा कायंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे. राहुल शेवाळे यांनी मनिषा कायंदे यांच्यावरही गंभीर आरोप केल्याची माहिती समोर आली होती. शेवाळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित मनिषा कायंदे यांच्याबद्दल तक्रार केली होती. कायंदे यांच्याकडून एका माजी आमदाराला गुंडांच्या मदतीने ब्लॅकमेलिंग केली जात असल्याचा आरोप शेवाळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात केला होता. त्यानंतर आता मनिषा कायंदे यांनी राहुल शेवाळे यांच्यावर निशाणा साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही आव्हान दिलं.

“‘राहुल शेवाळे यांचं काय करायचं ही एकनाथ शिंदेंची जबाबदारी आहे. एकनाथ शिंदे आनंद दिघे यांचे सख्खे चेले असतील तर ते कारवाई करतील”, असं आव्हान मनिषा कायंदे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं.

हे सुद्धा वाचा

“राहुल शेवाळे यांनी माझ्यावर केलेले आरोप हे मुळात प्रकरणच नाहीय. त्यांच्या विरोधात जी महिला आवाज करतेय, चार-पाच महिन्यांपासून हा विषय चालूय. तुम्ही आज सांगताय की तिचं पाकिस्तान कनेक्शन आहे. मग तुमचं जुम्मा चुम्मा दे दे हे काय चालू होतं? ते जरा लोकांना सांगाना. हे शब्द बोलणंही मला चुकीचं वाटतंय. हे खासदार आहेत. यांना कळत नाहीय का?”, असा सवाल मनिषा कायंदे यांनी केला.

“हे जेवढं चिखलात उड्या मारत आहेत तितकं ते चिखलात खोल जाणार आहेत”, अशी टीका मनिषा कायंदे यांनी राहुल शेवाळे यांच्यावर केली.

“ज्यांनी कोणी खंडणीचे आरोप केले आहेत त्यांना समोर आणा. महिलांना बदनाम करणं हेच त्यांचं हिंदुत्व आहे का?”, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

यावेळी त्यांनी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावरुनही सत्ताधाऱ्यांवर टीका केली. “खरंतर सभागृहाचा वेळ जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी खर्ची व्हायला पाहिजे. राज्यात आज अंगणवाडी सेविकांचा ज्वलंत प्रश्न आहे. प्राध्यापकांचा प्रश्न आहे, बेरोजगार तरुणांचे प्रश्न आहेत. पण दुर्देवाने सत्ताधारी अधिवेशन बंद करण्याचं काम करत आहेत”, अशीदेखील टीका त्यांवी यावेळी केली.