AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report : महापालिकेत ठाकरे गट-शिंदे गटात राडा, निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच राजकारण पेटले

शिंदे गटाच्या नेत्यांनी शिवसेना कार्यालयाचा ताबा घेतल्यानंतर ठाकरे गटाचे नेतेही कार्यालयात आले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी सुरू झाली.

Special Report : महापालिकेत ठाकरे गट-शिंदे गटात राडा, निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच राजकारण पेटले
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Dec 29, 2022 | 9:05 AM
Share

मुंबई : महापालिकेत ठाकरे गट आणि शिंदे गटात जोरदार राडा झाला. मुंबई मनपा कार्यालयात आज दोन्ही गट आमनेसामने आले. महापालिकेतील कार्यालयावर शिंदे गटानं दावा केला. त्यानंतर हा राडा झाला. शिंदे गटाकडून चाळीस खोके एकदम ओकेच्या घोषणा देण्यात आल्या. तर ठाकरे गटाकडून एयूची घोषणाबाजी करण्यात आली. शिंदे गटाच्या नेत्यांची आयुक्तांसोबत बैठक होती. या बैठकीनंतर शिंदे गटाचे नेते महापालिकेच्या शिवसेनेच्या कार्यालयात गेले. कार्यालयातील यशवंत जाधव यांच्या नावावर पट्टी बांधण्यात आली होती. ही पट्टीदेखील राहुल शेवाळे यांनी काढून टाकली. या बैठकीनंतर शिंदे गटाचे नेते शिवसेनेच्या कार्यालयात गेले. त्यानंतर शिवसेना गटाच्या नेत्य़ांनी शिंदे गटाच्या कार्यालयाचा ताबा घेतला.

शिंदे गटाच्या नेत्यांनी शिवसेना कार्यालयाचा ताबा घेतल्यानंतर ठाकरे गटाचे नेतेही कार्यालयात आले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी सुरू झाली.

राहुल शेवाळे म्हणाले, मुंबईच्या आयुक्तांसोबत बैठक झाली. धोरणात्मक निर्णय झाले. मुंबईच्या विकासाचे कामं होत आहेत. त्याचा निर्णय करण्यात आला. शिवसेनेच्या नावानं दमदाटी करण्याचा प्रयत्न झाला, हे दुर्वैवी आहे.

आम्ही येथे होतो. येथेचं राहणारे, असं ठाकरे गटानं ठणकावूनं सांगितले. आयुक्तांनी मुंबईच्या विकासासाठी चांगले निर्णय घेतले. या निर्णयाला गालबोट लावण्याचं काम करतात, असंही सांगण्यात आलं. शिवसेना कार्यालय आमचंही आहे. घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न झाला. हे खपवून घेणार नसल्याचं राहुल शेवाळे यांनी सांगितलं.

आम्ही येथे असताना हे आले नाहीत. ते आम्ही असताना आले असतो तर ते मर्द असल्याचं सांगितलं. मुंबई मनपा निवडणुका जवळ आल्यात. कार्यकाळ संपला तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत जनता असल्याचं ठाकरे गटाच्या नेत्यानं सांगितलं.

Follow Us
शिल्पा गवारे यांच्या शोकसभेत उपमहापौर हसल्या; VIDEO होतोय व्हायरल
एका बाजूला शिल्पा गवारे यांना श्रद्धांजली, दुसरीकडे उपमहापौर हसताना दिसल्या; VIDEO होतोय व्हायरल
जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस! शिष्टमंडळाची आज पुन्हा भेट
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस! सरकारच्या शिष्टमंडळाची आज पुन्हा भेट, चर्चेकडे महाराष्ट्राचं लक्ष
मसाज सेंटरच्या नावाखाली काय सुरू होतं?; पोलिसांनी टाकला छापा
Nanded | मसाज सेंटरच्या नावाखाली काय सुरू होतं?; डमी ग्राहक पाठवून पोलिसांनी टाकला छापा, 7 महिलांची सुटका
माझा भाऊ गेला, आता सत्ता हे लोक उपभोगत आहेत! सुप्रिया सुळे संतापल्या
Supriya Sule on Ajit Pawar Accident | माझा भाऊ गेला, आता सत्ता हे लोक उपभोगत आहेत! सुप्रिया सुळे संतापल्या; अजित पवारांच्या अपघातावरून घणाघात
जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचा एल्गार! परळी बंद
Maratha Reservation | जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचा एल्गार! परळी बंद, हिंगोली-नांदेडमध्ये रास्ता रोको
मुंबईत RSS-BJPची मोठी समन्वय बैठक! फडणवीसांसह मंत्री उपस्थित
Mumbai RSS BJP | मुंबईत RSS-BJPची मोठी समन्वय बैठक! फडणवीसांसह मंत्री उपस्थित; राजकीय-सामाजिक मुद्द्यांवर मंथन
धनगर समाजाचा 7 सप्टेंबरला राज्यव्यापी एल्गार! ST आरक्षणाच्या मागणीसाठी
Gopichand Padalkar | धनगर समाजाचा 7 सप्टेंबरला राज्यव्यापी एल्गार! ST आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रभर आंदोलनाची हाक
चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित
Mumbai FDA : चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित; स्वच्छता निकषांचे उल्लंघन
सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28...
Shivsena Hearing : सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28 वा मुद्दा सर्वात खास
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि...
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि... गुणरत्न सदावर्तेंची पत्रकार परिषद ऐकाच!