
योगेश लोंढे/प्रतिनिधी, नांदेड : इंस्टाग्रामवर गेल्या काही दिवसापासून एक ट्रेंड प्रचंड व्हायरल होत आहे. मोबाईलची बॅटरी लावून त्यावर काचेचा पाण्याने भरलेला ग्लास ठेवून पाण्यात कोरडी हळद टाकली जाते त्यानंतर पाण्यात आकर्षक असं सुंदर दृश्य तयार होतं. यातील एका – एका रीलला 12 कोटींपेक्षा अधिक लोक बघत आहेत. यामागे शास्त्रीय कारणे नांदेड येथील यशवंत महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर मदन अंभोरे यांनी स्पष्ट केले आहेत. अशा प्रयोगांमुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत विज्ञानाविषयीची जागरुकता, रूची वाढत असल्याचे दिसून येते.
तुम्हाला माहिती आहे का?
हळदीत कर्क्युमिन घटक असतो त्यावर प्रकाश पडला की तो प्रकाश प्रवर्तित करतो, त्यामध्ये औषधी गुणधर्म सुद्धा असतात. कर्क्युमिन घटकाच पाण्यात विरघळण्याचे प्रमाण कमी आहे. अल्कोहोल मध्ये मिथेनाईल द्रवणामध्ये कोरडी हळद टाकून हा प्रयोग केला तर जास्त प्रकाशित होतो. ही जादू अनुभवण्यासाठी देशातील अनेक जण हा प्रयोग करतात. त्यात अबालवृद्धांचा मोठा सहभाग आहे. म्हणजे इन्स्टाग्रामवरून केवळ टाईमापास रिल्स अथवा बिभत्स रिल्सचा ऊत असतो असे नाही तर इन्स्टावर अशा वैज्ञानिक प्रयोगाची पण चलती आहे हे समोर येते.
पाण्यापेक्षा हळदीतील कर्क्युमिन या घटकाची विरघळण्याची क्षमता अल्कोहोल मध्ये जास्त आहे. विज्ञानामध्ये अशा प्रकारचे प्रयोग सेल इमेजिंग साठी केला जातो, कॅन्सर मारण्याचे काम देखील कर्क्युमिन करत असतो, अशी माहिती या महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. मदन अंभोरे यांनी दिली. त्यांच्या या प्रयोगांमुळे अबालवृद्धात वैज्ञानिक प्रयोगाची गोडी निर्माण झाल्याचे या व्हायरल ट्रेंडमुळे दिसते. विज्ञानाकडे क्लिष्ट म्हणून पाहणारे सुद्धा हा प्रयोग करून पाहतात हीच त्यामागील खरी गंमत आहे.
विविध उपक्रमातून शिक्षण
या प्रयोग शाळेत वेगवेगळे इस्टिमेट आहेत. आता जो चालू आहे त्या अनुषंगाने आमच्याकडे विज्ञान मंच आहे. 15000 पेक्षा अधिक शेतकर्यांचे माती परीक्षण आम्ही या प्रयोगशाळेतून करून दिल आहे. अशा ट्रेंडमुळे पुष्कळ शिकायला मिळते, अशी माहिती नांदेड येथील यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य गणेशचंद्र शिंदे यांनी दिली.