AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी मारलं, मग थेट… मित्राचा काटा काढण्यासाठी तीन अल्पवयीन मुलांचा धक्कादायक कांड; प्लॅनिंग वाचून धक्काच बसेल!

मुंबईतील भांडुप येथील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. चार अल्पवयीन मुलांनी मित्राला ठार मारले आहे. संशय येऊ नये म्हणून त्याला तलावात फेकले.

आधी मारलं, मग थेट... मित्राचा काटा काढण्यासाठी तीन अल्पवयीन मुलांचा धक्कादायक कांड; प्लॅनिंग वाचून धक्काच बसेल!
CrimeImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Mar 02, 2026 | 5:38 PM
Share

मुंबईतील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. गुंडगिरीच्या वादातून तीन अल्पवयीन मुलांनी वर्गमित्राची हत्या केली. हत्या केल्याचे कळू नये म्हणून त्यांनी मित्राचा मृतदेह हा तलावात फेकून दिला. हत्येनंतर नंतर 14 वर्षांच्या मुलांनी सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी चौकशी केल्यानंतरही त्यांनी मित्राचा बुडून मृ्त्यू झाल्याचे सांगितले. पण शेवटी दोघांनी हत्या केल्याची कबूली दिली.

नेमकं काय घडलं?

ही घटना मुंबईतील भांडुप येथे घडली आहे. भांडुप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळशेत पाडा परिसरात सिद्धार्थ वास्तव्यास होता. २२ फेब्रुवारीला दुपारी तीनच्या सुमारास तो खेळायला जातो सांगून घराबाहेर पडला. रात्री उशिरापर्यंत सिद्धार्थ घरी न आल्याने पालकांनी त्याचा शोध सुरू केला. मात्र, कुठेच न सापडल्याने अखेर पालकांनी भांडुप पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध सुरू केला. पोलिसांकडून गुन्ह्याचा तपास आणि शोध सुरू असतानाच मुलुंड पोलिसांच्या हद्दीमध्ये विहार तलावाजवळ २३ फेब्रुवारीला सिद्धार्थचा मृतदेह सापडला.

भांडुपमधील मुले विहार तलावात पोहण्यासाठी जातात, त्यानुसार पोहण्यासाठी गेला असता सिद्धार्थ बुडाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे पोलिसांनी प्रथम अपमृत्यूची नोंद केली. याचदरम्यान सिद्धार्थचा शवविच्छेदन अहवाल आला. त्यात सिद्धार्थच्या फुफ्फुस आणि पोटात पाणी नसल्याचे नमूद करण्यात आले होते. त्याचबरोबर डोक्याच्या मागील बाजूस दुखापत आणि अंतर्गत रक्तस्राव झाल्याचेही अहवालात नमूद होते. यावरून पोलिसांनी नव्याने तपास सुरू केला.

पोलिसांनी घेतला शोध

सिद्धार्थला त्याच्या एका मित्रासोबत शेवटचे पाहिल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शीनी दिली. त्यानुसार या मित्राला ताब्यात घेऊन चौकशी केली असता आम्ही चौघे पोहायला गेलो होतो, त्यावेळेस सिद्धार्थ बुडाल्याचे तो सांगू लागला. इतर दोन मित्रांनीही चौकशीत हेच सांगितले. शवविच्छेदन अहवालानुसार हत्येचा संशय असल्याने पोलिसांनी तिघांची स्वतंत्रपणे चौकशी केली असता अखेर त्यांनी सिद्धार्थला मारून तलावात टाकल्याचे कबुल केले. सिद्धार्थ आमच्यावर कायम दादागिरी करायचा. त्याला इंगा दाखविण्यासाठी तलावाजवळ बोलावून मारहाण केली. मारहाणीत काठीचा मार डोक्यावर बसल्याने तो बेशुद्ध पडला होता.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...