Mumbai News : झाडांना विषारी इंजेक्शन ते खड्डेमुक्त मुंबईच्या दाव्यानंतरही पुन्हा कोट्यवधींची तरतूद, मुंबईतील पाच महत्वाच्या बातम्या

Mumbai News : मुंबईत झाडं पाडण्यासाठी विषारी इंजेक्शन दिल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याशिवाय मुंबईत सर्वत्र काँक्रिंटचे रस्ते करुनही पुन्हा एकदा खड्डे बुजवण्यासाठी कोट्यवधीची तरतूद करावी लागली आहे. जाणून घ्या मुंबईतील पाच महत्वाच्या बातम्या.

Mumbai News : झाडांना विषारी इंजेक्शन ते खड्डेमुक्त मुंबईच्या दाव्यानंतरही पुन्हा कोट्यवधींची तरतूद, मुंबईतील पाच महत्वाच्या बातम्या
Trees-Potholes
| Updated on: Aug 04, 2026 | 9:06 AM

वृक्षसंवर्धन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेने कठोर कारवाई केली आहे. मालाडमधील शितल तपोवन हाऊसिंग सोसायटीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. झाडांना विषारी इंजेक्शन देऊन सुकवल्याचा आरोप आहे. पेट्रोफोरम प्रजातीच्या झाडांच्या बुंध्यात छिद्रे पाडून इंजेक्शन दिल्याचा आरोप.घाटकोपरमधील कल्पतरू ऑरा सोसायटीविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. मंजूर परवानगीपेक्षा अधिक प्रमाणात 100 हून अधिक झाडांची छाटणी केल्याचा आरोप. वृक्षांना इजा, तोडणं किंवा छाटणीसाठी पालिकेची पूर्वपरवानगी अनिवार्य आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि विकासकांवर कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धन नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा पालिकेचा निर्धार.

दक्षिण मुंबईतील खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने 3.85 कोटींची तरतूद केली आहे. खड्डेमुक्त मुंबईच्या दाव्यानंतरही पुन्हा कोट्यवधींची तरतूद करावी लागली आहे. खड्डे कमी झाल्याचा दावा केला होता. पण दुरुस्तीसाठी पुन्हा 3.85 कोटींचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये चर्चिला जाणार आहे. शहर विभागातील खड्डे बुजविण्यासाठी 3 कोटी 85 लाख रुपयांचा प्रस्ताव आहे. मार्च 2027 पर्यंत रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. परिमंडळ-1 मधील ए, बी, सी, डी आणि ई विभागातील रस्त्यांवर काम होणार. 9 मीटरपेक्षा रुंद रस्त्यांवरील खड्डे मास्टिक तंत्रज्ञानाने बुजविण्यात येणार. कामासाठी मानष कन्स्ट्रक्शन कंपनीची निवड झाली आहे. प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजुरीसाठी सादर करण्यात येणार.

अपंगांच्या राखीव जागांवर बसणाऱ्यांना मध्य रेल्वेचा दणका. महिनाभरात ६७७जणांवर कारवाई, १०.१० लाखांचा दंड वसूल. राखीव जागांवर अनधिकृतपणे बसणाऱ्या ३२१ जणांवर कारवाई करण्यात आली , तर ६.३७ लाख रुपयांचा दंड वसूल केला. अपंग प्रवाशांसाठी असलेल्या राखीव जागांवर बसणारे तसेच रेल्वे परिसरातील अनधिकृत फेरीवाले आणि रेल्वे हद्दीत विनापरवानगी प्रवेश करणाऱ्यांवर मध्य रेल्वेने कारवाईचा बडगा उगारला आहे. मुंबई विभागाने जुलै महिन्यात विशेष मोहीम राबवून ६७७ जणांवर कारवाई केली. या कारवाईत एकूण १० लाख १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या विशेष मोहिमेत मानखुर्द स्थानकात सर्वाधिक २८९ प्रकरणे नोंदली गेली असून ४.४९ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यानंतर वडाळा रोड येथे २३२ प्रकरणे व २.५७ लाखांचा दंड, तर ठाणे स्थानकावर ६१ प्रकरणांत १.२२ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला तसेच सीएसटी आणि इतर स्थानकावर देखील या विशेष मोहिमेत कारवाई करण्यात आली.

मुंबई महापालिका हटवणार 320 km पदांवरील अतिक्रमणं. मुंबईकरांचा पायी प्रवास सुरक्षित सुलभ आणि अडथळा मुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेने पेढेस्ट्रीयन फर्स्ट मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात शहरातील 320 किलोमीटर लांबीच्या पदपथांवरील अतिक्रमणे हटवण्यात येणार आहेत. जर कोणी अंमलबजावणीत हलगर्जीपणा केला तर त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देखील करू असं आयुक्तन्नी सांगितलं आहे. आता मुंबईकरांना त्यामुळे पदपथांवर निर्धास्त चालता येईल अशी अपेक्षा देखील महापालिकेने केली आहे. या मोहिमे दरम्यान पदपथांवर लावलेले अनधिकृत जाहिरात फलक, होरडी इमारतींच्या प्रवेशद्वारांचे बाहेरच्या बाजूस उघडणारे दरवाजे हटविण्यात येतील.

जुहूमधील इमारतीच्या पाण्याच्या टाकीत सुरक्षा रक्षकाचा मृतदेह आढळला. जुहूतील एन.एस. रोडवरील एका इमारतीच्या भूमिगत पाण्याच्या टाकीत 40 वर्षीय सुरक्षा रक्षक मनोज यादव यांचा मृतदेह आढळला. यादव यांचा मृत्यू संशयास्पद असल्याने जुहू पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.मृतदेह सापडला तेव्हा त्यांचे दोन्ही हात मागे बांधलेले होते आणि गळ्यावर खुणा असल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. पोलिसांनी हत्येचा संशय व्यक्त करत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. मृत्यूचे नेमके कारण पोस्टमॉर्टेम अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.मनोज यादव गेली 15 वर्षे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते आणि कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us