Uday Samant: ‘ऑपरेशन टायगर’ कधी होणार? ठाकरे सेनेचे 14 आमदार फुटणार? उदय सामंत यांचे मोठे वक्तव्य, काय दिले उत्तर?
Uday Samant On Operation Tiger: उद्यापासून सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष कुणाचा याविषयीची सुनावणी सुरू होत आहे. तर त्याचवेळी ऑपरेशन टायगरची चर्चा रंगली आहे. ठाकरे सेनेचे 14 आमदार फुटणार? असा दावा करण्यात येत आहे. त्यावर मंत्री उदय सामंत यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

उद्यापासून शिवसेना बाबतची सुनावणी सर्वोच्च न्यायालय सुरू होत आहे. आमची भूमिका देखील उद्या आम्ही कोर्टासमोर मांडणार आहोत. वकील कोर्टाकडे आमची कागद पत्र दाखवातील. प्रसार माध्यमांनी ही आमची भूमिका सर्व सामान्यांसमोर ठेवावी. एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाणार हे देखील मला देखील आत्ताच कळालं आहे, अशी प्रतिक्रिया उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. त्याचवेळी त्यांनी ऑपरेशन टायगरवर मोठे भाष्य केले. नवरात्रीपूर्वी उद्धव ठाकरे सेनेचे 14 आमदार शिंदे सेनेत दाखल होणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यावर मंत्री सामंत यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
विकास दरावरून विरोधकांना टोला
विरोधकांनी टीका केल्या नंतर आमची ऊर्जा वाढते, असा टोला उदय सामंत यांनी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचं जगामध्ये एक स्थान निर्माण केलं. त्यामुळे जगाने दखल घ्यावं एवढा जीडीपी झाला आहे. पंतप्रधानांच्या कर्तृत्वाने हे सिद्ध केलं आहे, असे ते म्हणाले. भारताचा जीडीपी दर 7.08 टक्के इतका आहे. या आर्थिक वर्षातील ही आकडेवारी समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
ऑपरेशन टायगरवर मोठे भाष्य
ऑपरेवशन टायगर सांगून होत नाही. ज्या दिवशी होईल त्या दिवशी सर्वाना समजेल. सर्वच जण एकनाथ शिंदे नेतृत्व मान्य करतात, असे मोठे वक्तव्य उदय सामंत यांनी केले. फोडा फोडीचे राजकारण करणाच्याही गरज नाही असे ते म्हणाले. जी लोक माझ्या जिल्ह्यात एमआयडीसी बघायला गेले. दुसर्या दिवशी ते वरळी मतदार संघात गेले त्यावेळीस महिलेने सांगितलं आधी आपल्या मतदार संघात लक्ष द्या, असा टोलाही त्यांनी लगावला. सर्वांना नैसर्गिक पाणी मिळणे हा हक्क आहे मात्र कोणी टँकर माफिया होत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
ऑपरेशन टायगर 2 ची मोठी चर्चा
ऑपरेशन टायगर 2 ची आज सकाळपासूनच मोठी चर्चा सुरू झाली आहे. काल परवाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल झाले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यात शिवसेनेविषयी चर्चा झाल्याचे समजते. आज शिंदे हे दिल्लीत जाणार असल्याचे समजते. त्याचवेळी राज्यात ऑपरेशन टायगर 2 ची चर्चा रंगली आहे. ठाकरे सेनेचे 14 आमदार नवरात्रीपूर्वी शिवसेनेत दाखल होतील असा दावा करण्यात येत आहे. उद्यापासून सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष कुणाचा यावरून सुनावणी सुरू होणार आहे.