AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar: MPSC पेपरफुटीप्रकरणात रोहित पवार आक्रमक, तुकाराम मुंढे यांचे नाव घेत सर्वात मोठी मागणी काय?

Rohit Pawar on MPSC: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नवी मुंबईतील कार्यालयावर आमदार रोहित पवार यांनी धडक दिली आहे. यावेळी त्यांनी आयोगावर आरोपांच्या फैरी झाडल्या. तर यावेळी त्यांनी एक मोठी मागणी केली आहे. त्यांनी बेलापूर येथे आंदोलन पुकारले असून त्यात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.

Rohit Pawar: MPSC पेपरफुटीप्रकरणात रोहित पवार आक्रमक, तुकाराम मुंढे यांचे नाव घेत सर्वात मोठी मागणी काय?
रोहित पवार, एमपीएससीImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Sep 01, 2026 | 1:08 PM
Share

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज बेलापूर येथील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयावर धडक दिली. त्यांनी आयोगाच्या सचिवांची भेट घेतली. यावेळी विद्यार्थ्यांच्या तीव्र भावना त्यांनी आयोगाला कळवल्या. आयोग अजून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना, आरटीआयमध्ये विचारण्यात येणारी माहिती देत नसल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांना आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा अशी मोठी मागणी केली आहे. तुकाराम मुंढे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी त्यांनी केली.

आयोगाकडून उत्तरंच नाही

इथलं जे सचिव आहेत, ते सरकारने नियुक्त केलेले असतात. आयोगाला एक चेअरमन, अध्यक्ष असतो. आता आम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवांना भेटलो. एसआरओ, एसटीआय गट ब, या ज्या परीक्षा झाल्या, त्यामध्ये जे उत्तर देण्यात आलेले आहेत. त्याविषयी विद्यार्थ्यांच्या मनात काही शंका होत्या. विद्यार्थ्यांनी समोर येत त्या शंका मांडलेल्या आहेत. एफएसओ 2023 मध्ये जी परीक्षा झाली होती. त्यामध्ये सुद्धा काही मुद्दे विद्यार्थ्यांनी आज मांडले. राज्य सेवा मुख्य परिक्षेविषयी काही प्रश्न होते. या तीन ते चार परीक्षेत घोळ झाला असे आमचे म्हणणे नाही. पण विद्यार्थ्यांच्या काही शंका आहेत, त्याचे निरसन झाले पाहिजे. कारण एमपीएससीकडे काही पत्रं, निवदेनं देण्यात आली. याविषयी 20 आरटीआय करण्यात आले. तरीही विद्यार्थ्यांना उत्तरं दिली जात नाहीत. विद्यार्थ्यांनी आयोगाला ई-मेल केले होते. त्यालाही आतापर्यंत उत्तर आलं नाही. सचिवांना भेटून आम्ही ते मुद्दे मांडले आहेत, असे आमदार रोहित पवार म्हणाले.

आयोगाच्या कारभारावर ताशेरे

माझ्यासोबत ऋषिकेश गांगर्डे हे सुद्धा आहेत. एमपीएससीमध्ये औषध निरीक्षकाचा, ड्रग्स इन्स्पेक्टरचा जो पेपर फुटला होता. त्यासाठी त्यांनी खूप पुढाकार घेतला होता. त्यांनी तक्रार केली होती. त्यांचे या परीक्षेविषयी काही प्रश्न होते. त्यांचे म्हणणे होते मी प्रामाणिक राहिलो. विद्यार्थ्यांसोबत राहिलो. पेपर फुटल्याचे त्यांनी सांगितले होते. तर आयोगाने पेपरफुटीतील दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटला, त्याचा पुरावा आहे. आयोगाने चौकशी केली आहे. आता ज्यांनी हा पेपर घोटाळासमोर आणला, त्यांचे समर्थन आयोगाने करावे. त्यावेळी आयोगाचे अध्यक्ष आणि सचिवांनी पत्रकार परिषद घेऊन त्यावेळी पेपर फुटला नाही असा दावा केला होता. आता पेपर फुटला आहे. तपासात या या गोष्टी समोर आल्या हे पत्रकार परिषद घेऊन सांगा, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली.

आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी

या पेपर फुटीत जे तीन महत्त्वाचे अधिकारी आहेत, अभिजीत लेंडवे, सहाय्यक नखाते आणि गोपाल मराठे हे ज्या दिवसांपासून कार्यरत आहे, त्यादिवसापासून अंतर्गत चौकशी होण्याची मागणी आम्ही सर्वांनी केली आहे. आता महिना झाला, ज्यांच्याविरोधात पुरावा दिला. नावं दिली, तरीही पोलीस त्यांना पुन्हा तेच तेच प्रश्न विचारत आहेत, मग पोलिस या प्रकरणात काय करत आहेत? असा सवाल रोहित पवार यांनी विचारला. बेलापूर येथील एमपीएससी कार्यालयाबाहेर रोहित पवार आंदोलन करीत आहेत. आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा यासाठी त्यांनी आंदोलन पुकारले आहे. त्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा