AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीसांचे निकटवर्तीय, डोक्यावर आशीर्वादाचा हात, अनेक गुन्ह्यांत सहभागाचा आरोप, मलिकांनी आरोप केलेला मुन्ना यादव कोण?

मुन्ना यादव हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातून दोन वेळा मुन्ना यादव नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. मुन्ना यादवसाठी फडणवीसांनी मतदानही मागितलं आहे.

फडणवीसांचे निकटवर्तीय, डोक्यावर आशीर्वादाचा हात, अनेक गुन्ह्यांत सहभागाचा आरोप, मलिकांनी आरोप केलेला मुन्ना यादव कोण?
मुन्ना यादव देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत
| Edited By: Akshay Adhav | Updated on: Nov 10, 2021 | 2:09 PM
Share

मुंबई :  राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी 10 वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला करताना पाच ते सहा वेळा मुन्ना यादवचं नाव घेतलं. मुन्ना यादवचं नाव घेऊन त्यांनी फडणवीसांवर हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला. मलिकांची पत्रकार परिषद संपते ना संपते तोच भाजप आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन मुन्ना यादववर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. यानंतर साहजिक, हा मुन्ना यादव नावाचा व्यक्ती आहे तरी कोण?, असा प्रश्न अनेकांना पडला.

फडणवीसांचे निकटवर्तीय, निवडणुकीवेळी डोक्यावर हात, मुन्ना यादव नेमका कोण?

मुन्ना यादव भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत. ते मुळचे नागपूरचे आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय विश्वासू सहकारी आणि निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. गेल्या 25 वर्षांपासून ते भाजपचे कार्यकर्ते आहेत. म्हणजेच फडणवीस यांच्या राजकीय कारकीर्दील सुरुवात झाल्यापासून मुन्ना यादव भाजपचे कार्यकर्ते आहेत. पण मुन्ना यादवच्या नावावर अनेक गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. याच गुन्ह्यांमुळे मुन्ना यादवला अनेकदा जेलची हवा देखील खावी लागली आहे. राजकीय नेते अनेकदा फडणवीसांवर टीका करताना मुन्ना यादवचा आवर्जून उल्लेख करतात.

मुन्ना यादव हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातून दोन वेळा मुन्ना यादव नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. मुन्ना यादवसाठी फडणवीसांनी मतदानही मागितलं आहे. त्याच्यासाठी प्रचारही केला आहे. तो कामगार मंडळाचा माजी अध्यक्ष राहिलेला आहे. विशेष म्हणजे फडणवीसांच्या इलेक्शन प्लॅनिंगमध्येही मुन्ना यादव अग्रेसर असतो. त्याची पत्नी सध्या भाजपची नगरसेवक आहे.

मुन्ना यादवला मोठ्या प्रमाणात राजकीय पाठबळ आहे. फडणवीसांच्या जवळचा कार्यकर्ता म्हणून त्याला विशेष ट्रिटमेंट दिल्याचा आरोपही 2014 ते 2019 दरम्यान झाला. एकंदरित नागपूरच नाही तर राज्याच्या राजकारणात देखील मुन्ना यादवचं नाव सातत्याने प्रकाशात असतं.

मलिक यांनी मुन्नावर कोणते आरोप केले?

मुन्ना यादव नागपूरचा कुविख्यात गुंड, त्याच्यावर हत्येचे अनेक गुन्हे, तो देवेंद्र फडणवीस यांचा साथी आहे. त्या मुन्ना यादवला कन्स्ट्रक्शन वर्क्स बोर्डाचा सदस्य बनवलं होतं की नाही ते फडणवीसांनी स्पष्ट करावं. तुमच्या गंगेत अंघोळ करून मुन्ना यादव पवित्रं झाला का?, असा सवाल मलिकांनी यावेळी विचारला.

मलिकांच्या आरोपांना मुन्ना यादवचं सणसणीत प्रत्युत्तर

मी गेल्या 25 वर्षांपासून राजकारणात आहे. भाजपचा 10 वर्षे नगरसेवक होतो. त्यामुळं माझ्यावर काही राजकीय गुन्हे आहेत. याचा अर्थ मी काही गुंड नाही, असा उत्तर मुन्ना यादवने मलिकांना दिलं. नवाब मलिक माझी बदनामी करत आहेत. त्यांच्याविरोधात मी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं देखील मुन्ना यादवने सांगितलं.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मला बांधकाम कामगार मंडळाचे अध्यक्ष केले. कारण मी बऱ्याच वर्षांपासून राजकारणात आहे. माझ्यावर असलेले गुन्हे हे राजकीय आहेत. निवडणुकीच्या वादातून हे गुन्हे विरोधकांनी माझ्याविरोधात दाखल केले आहेत. आंदोलन करीत असताना राजकीय गुन्हे दाखल होतात. माझ्याविरोधात गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे नाहीत. याप्रकरणी आधीच माझी चौकशी झाली आहे. त्यात काहीही सापडले नाही. सरकार त्यांचे आहे. आता पुन्हा चौकशी करावी. मी चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे, असंही मुन्ना यादव म्हणाला.

हे ही वाचा :

नवाब मलिकांच्या हायड्रोजन बॉम्बनंतर देवेंद्र फडणवीसांचं लगेचच ट्विट; म्हणाले, डुकराशी कुस्ती…

रियाझ भाटीचं सचिन वाझे प्रकरणात नाव, राष्ट्रवादी काँग्रेसनं त्याला लपवलंय का? आशिष शेलार यांचा सवाल

सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर पगाराची जबाबदारी घेणार का? एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावं, अनिल परब यांचं आवाहन

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ