भाजप नेता मुन्ना यादववर विनयभंगाचा गुन्हा

मुन्ना यादव हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वासू आहे.

भाजप नेता मुन्ना यादववर विनयभंगाचा गुन्हा
आगामी निवडणुका भाजपसाठी प्रतिष्ठेच्या आहेत. अशात भाजपने पक्षातील अनुभवी आणि विश्वासपात्र नेत्यांकडे जबाबदारी देण्यास सुरुवात केली आहे.
Follow us
| Updated on: Feb 07, 2021 | 7:12 AM

नागपूर : भारतीय जनता पक्षाचा नेता आणि राज्य कामगार विकास महामंडळाचा माजी अध्यक्ष मुन्ना यादव याच्याविरोधात शहर पोलिसांनी महिलेची गुंडगिरी आणि विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती देण्यात आली आहे. मुन्ना यादव हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वासू आहे. मालमत्ता वादाशी संबंधित असलेल्या प्रकरणामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. (BJP leader Munna Yadav charged with molestation in nagpur)

मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल केल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे. राजेंद्र यादव, गणेश यादव आणि प्रमोद डोंगरे अशी मुन्ना यादव व्यतिरिक्त आरोपींची नावं आहेत. प्रमोद डोंगरे हा जमीन विक्रेता असल्याचंही पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

अधिक माहितीनुसार, फिर्यादी एक 40 वर्षाची महिला असून ती प्रताप नगर पोलीस स्टेशन परिसरात राहते. या महिलेने प्रमोद डोंगरेसोबत जयताला इथल्या पांडुरंग नगर इथं 12 लाखाचा एक घरगुती करार केला होता. इतकंच नाही तर 6 ते 12 डिसेंबर 2020 पर्यंत तक्रारदार आणि जमीन मालकाशी आपसात घरगुती करारावरून चर्चा होती. आरोपीने महिलेने 6 लाख रुपये दिल्याचंही सांगण्यात येत आहे.

हे घर सीनू होरो या व्यक्तीचं असून तो झारखंडचा आहे. त्याने डोंगरे या व्यावसायिकाला घर विकत घेण्याचा अधिकार दिला होता. पण डोंगरे याने महिलेचं नाव नोंदवलंच नाही. त्यामुळे वाद पेटला की डोंगरे याने हे घर राजवीर यादव याला विकलं. राजवीर यादव मुन्ना यादवचा जवळचा आहेत.

यावेळी मुन्ना यादवने संबंधित महिलेला अजनी चौकातील संपर्क कार्यालयात बोलावून घेत राजवीरशी वाद घालू नका असं सांगितल्या आरोप केला जात आहे. 2 जानेवारी 2021 ची घटना आहे. मुन्ना यादवने तिला धमकावल्याचंही सांगण्यात येत आहे. तिला जीवे मारण्याचीही धमकी देण्यात आली होती.

मुन्ना यादव नेहमीच असतो वादाच्या भोवऱ्यात

मुन्ना यादव अनेकदा जमिनीच्या वादात असतो. त्यांच्या पत्नी नगरसेविका होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तो निकटवर्तीय म्हणून त्यांची पदोन्नती झाली आहे. विधानसभेच्या दोन्ही सभागृहात यादवचे वाद मोठे चर्चेत आले होते. त्यामुळे आता या प्रकरणावरून पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडणार आहे. (BJP leader Munna Yadav charged with molestation in nagpur)

संबंधित बातम्या – 

आधी बाळाचं मस्तक धडा वेगळं केलं नंतर ती वाशीच्या खाडीवर पोहोचली, पुढं जे घडलं त्यानं हादरवलं

एक टन वजनाच्या हाराने धनंजय मुंडेंचं जन्मगावी स्वागत, मुंडेंच्या आईंना अश्रू अनावर

गॅस दरवाढ आणि मोदींची दाढी, रुपाली चाकणकर म्हणतात…

(BJP leader Munna Yadav charged with molestation in nagpur)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.