VIDEO: बनावट नोटांचं प्रकरण दाबलं गेलं, तेव्हाही वानखेडेंकडेच चार्ज होता, हा योगायोग होता काय?; नवाब मलिकांचा सूचक सवाल

चार वर्षांपूर्वी 14 कोटींच्या बनावट नोटा पकडल्या गेल्या. त्यानंतर हे प्रकरण दाबलं गेलं. त्यावेळीही समीर दाऊद वानखेडेच अधिकारी होते. (Nawab Malik)

VIDEO: बनावट नोटांचं प्रकरण दाबलं गेलं, तेव्हाही वानखेडेंकडेच चार्ज होता, हा योगायोग होता काय?; नवाब मलिकांचा सूचक सवाल
nawab malik
Follow us
| Updated on: Nov 10, 2021 | 11:45 AM

मुंबई: चार वर्षांपूर्वी 14 कोटींच्या बनावट नोटा पकडल्या गेल्या. त्यानंतर हे प्रकरण दाबलं गेलं. त्यावेळीही समीर दाऊद वानखेडेच अधिकारी होते. हा योगायोग होता काय? असा सूचक सवाल करतानाच देवेंद्र फडणवीसांनीच हे प्रकरण दाबण्यासाठी मदत केली होती, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला.

नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोपांचा भडिमार केला. नोटाबंदीच्या एका वर्षानंतर 14 कोटी 56 लाखांच्या बनावट नोटा पकडल्या गेल्या. त्यावेळी या केसचे इनचार्ज होते समीर दाऊद वानखेडे. हा योगायोग होता. डीआयआरमध्ये ही केस झाली होती. 14 वर्षांपासून वानखेडे मुंबईत पोस्टिंगवर राहिले. पोस्टिंग ज्वॉइंट कमिशनर इंटेलिजन्स रेव्हेन्यू म्हणून 1 जुलै 2007मध्ये त्यांची पोस्टिंग झाली. त्यावेळी त्यांच्याकडे त्याच डिपार्टमेंट होते. त्यांनीच छापेमारी केली होती. ही केस कमकुवत करण्यासाठी फडणवीसांनी डीआयआरला मदत केली. हाजी अराफतचं प्रकरण दाबलं होतं. तसं हा योगायोगा असू शकतो, असं सांगतानाच म्हणूच कदाचित या अधिकाऱ्याला आता वाचवण्यासाठी फडणवीस या प्रकरणावरून लक्ष हटवत असावेत, असा संशय मलिक यांनी व्यक्त केला.

बनावट नोटांच्या धंद्याला फडणवीसांचं संरक्षण

8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदी झाली. तेव्हा नोटांबंदीमुळे दहशतवाद खतम होईल. काळापैसा बंद होईल. बनावट नोटा संपवण्यासाठी नोटाबंदी करण्यात येत आहे. नोटाबंदी नंतर संपूर्ण देशात 2000 आणि 500 च्या बनावट नोटा पकडल्या गेल्या. तामिळनाडू, पंजाबमध्ये बनावट नोटांवर कारवाई झाली. पण 8 ऑक्टोबर 2017 पर्यंत महाराष्ट्रात एकदाही बनावट नोटा पकडल्या गेल्या नाहीत. कारण फडणवीसांच्या संरक्षणात राज्यात बनावट नोटांचा धंदा सुरू होता. 8 ऑक्टोबर 2017 रोजी 14 कोटी 56 लाखांच्या बनावट नोटा पकडल्या गेल्या. हे प्रकरण दाबण्यासाठी फडणवीसांनी मदत केली. बनावट नोटांचं नेक्सस दाऊद, बागंलादेश आणि पाकिस्तान पर्यंत आहे, असा दावाही त्यांनी केला.

एनआयएकडे प्रकरण का दिलं नाही?

मुंबईत या प्रकरणी एक अटक झाली. इम्रान आलम शेख असं या अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. पुण्यात रियाज शेखला अटक केली. नवी मुंबईत एकाला अटक केली. मात्र 14 कोटीच्या 56 जप्तीला 8 लाख 80 हजार दाखवून प्रकरण दाबलं गेलं. पाकिस्तानच्या बनावट नोटांचा भारतात सुळसुळात सुरू राहतो, दोन पासपोर्ट सापडल्यानंतरही काही दिवसात जमानत होते, आदी गंभीरप्रकरण एनआयएला का दिलं नाही? यात कोण आहे ते सांगितलं जात नाही. कारण बनावट नोटांना तात्कालीन सरकारचं अभय होतं. काँग्रेसचा नेता होता म्हणून सांगितलं. पण काँग्रेसचा नेता नव्हता. काही झालं तर काँग्रेसवर बील फाडण्याचं काम त्यावेळी केलं गेलं, असा आरोपही त्यांनी केला.

संबंधित बातम्या:

VIDEO: रियाज भाटी पंतप्रधानांपर्यंत कसा पोहोचला?, त्याच्याशी तुमचा संबंध काय?; नवाब मलिकांचा सवाल

मोदींनी नोटाबंदी केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात बनावट नोटांचे रॅकेट चालवले जायचे: नवाब मलिक

Nawab Malik PC Live : बनावट नोटांच्या रॅकेटला फडणवीस सरकारची सुरक्षा, नवाब मलिकांचा गंभीर आरोप

(Devendra Fadnavis is not only diverting my issue but also trying to defend Sameer Wankhede: Nawab Malik)

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.