ठाण्यात ऑफिसमध्ये घुसून पत्नीची चाकूने भोसकून हत्या

भाईंदर (ठाणे) : पत्नीच्या ऑफिसमध्य घुसून पत्नीची हत्या केल्याची खळबळजनक घटना ठाणे जिल्ह्यातील भाईंदर येथे घडली आहे. या घटनेनंतर पत्नी वीणा भोईर यांना तातडीने जवळील हॉस्पिटलला नेण्यात आले. मात्र, त्या मृत्यूमुखी पडल्याचे डॉक्टकरांनी घोषित केले. भाईंदर पश्चिमेकडे स्टेशन रोडवर असलेल्या वेंकेटेश्वर इमारतीत ही घटना घडली. वीणा भोईर या ऑफिसमध्ये गेल्या होत्या. पती अचानक ऑफिसात घुसला […]

ठाण्यात ऑफिसमध्ये घुसून पत्नीची चाकूने भोसकून हत्या
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

भाईंदर (ठाणे) : पत्नीच्या ऑफिसमध्य घुसून पत्नीची हत्या केल्याची खळबळजनक घटना ठाणे जिल्ह्यातील भाईंदर येथे घडली आहे. या घटनेनंतर पत्नी वीणा भोईर यांना तातडीने जवळील हॉस्पिटलला नेण्यात आले. मात्र, त्या मृत्यूमुखी पडल्याचे डॉक्टकरांनी घोषित केले. भाईंदर पश्चिमेकडे स्टेशन रोडवर असलेल्या वेंकेटेश्वर इमारतीत ही घटना घडली.

वीणा भोईर या ऑफिसमध्ये गेल्या होत्या. पती अचानक ऑफिसात घुसला आणि चाकूने सपासप वार करत वीणा यांना जखमी केलं. वीणा यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र, तरीही त्यांना हॉस्पिटलला नेण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी वीणा यांना मृत घोषित केले.

वीणा भोईर यांची पतीने हत्या का केली, हे अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र, आरोपी पतीने पत्नी वीणा भोईर यांच्या हत्या प्रकरणी स्वत:ला भाईंदर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. त्यामुळे आरोपी पतीकडूनच वीणा यांच्या हत्येचं नेमकं कारण कळू शकेल.

भाईंदर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत, अटकेची कारवाई केली आहे. पोलिसांनी आरोपी पतीची चौकशी सुरु केली असून, वीणा यांच्या हत्येचं कारण चौकशीत समोर येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.