AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकारणातील मोठी उलथापालथ; MIM ला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का, बड्या नेत्याने सोडला पक्ष

ठाण्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. MIM ला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे. बड्या नेत्याने पक्ष सोडला आहे.

राजकारणातील मोठी उलथापालथ; MIM ला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का, बड्या नेत्याने सोडला पक्ष
MIMImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 15, 2026 | 1:25 PM
Share

ठाण्यात मोठी उलथापालथ झाली आहे. ठाण्यात एमआयएमला मोठा धक्का बसला आहे. मुंब्र्यातील एमआयएमच्या बडा नेत्याने पक्षाची साथ सोडल्याचे समोर आलं आहे. ‘कैसा हराया’ फेम सहर शेख हिचे वडील यूनूस शेख यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यूनूस शेख यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने एमआयएमला मोठा धक्का बसला आहे. ठाण्यातील ही मोठी राजकीय घडामोड मानली जात आहे.

ठाणे महापालिकेतील एमआयएम पक्षाची नगरसेविका सहर शेख हिचे वडील यूनूस शेख चर्चेत आले आहेत. काही महिन्यांपूर्वी सहर शेख हिचे एक भाषण प्रचंड व्हायरल झाले होते. तिने निवडणुकीतील विजयानंतर कैसा हराया म्हणत विरोधकांना डिवलचं होतं. त्यानंतर तिने संपूर्ण मुंब्रा हिरवा करू, असा दावा देखील केला होता. मुंब्रा हिरवा करू इच्छिणाऱ्या सदर शेखच्या वडिलांनी शिंदेंच्या शिवेसेना प्रवेश केल्याचे समोर आलं आहे. युनूस शेख यांच्या शिवसेना प्रवेशाची महाराष्ट्रभर चर्चा सुरू झाली आहे.

युनूस शेख यांची शिवसेनेच्या अखिल भारतीय केबल सेना, कळवा मुंब्रा विधानसभा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  अखिल भारतीय केबल सेना ही शिवसेना शिंदे गटाची ही एक शाखा  आहे. एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने ही नियुक्ती करत असल्याचा पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. याच सहर शेखने महापालिका निवडणुकीच्या काळात मुंब्रा हिरवा करणार असे विधान भाषणात केले होते. तिचेच वडील आता हिंदुत्वाच्या वाटेवर दिसून येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

कोण आहेत युनूस शेख?

युनूस शेख हे एकेकाळी जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक होते. परंतु महापालिका निवडणुकीच्या काळात दोन्ही नेत्यांच्या मैत्रीला तडा गेला. त्यांनी मुलीसाठी शरद पवार गटाकडून उमेदवारी मागितली होती. परंतु ऐनवेळी उमेदवारी न दिल्याने त्यांनी मुलीसहित एमआयएम पक्षात प्रवेश केला होता. एमआयएमकडून तिकीट मिळवून निवडणूकही जिंकली होती. निवडणुकीनंतर विजयी सभेत बाप-लेकीने जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोदरदार टीका केली होती. त्यांनी ‘जीजी’ म्हणत जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीकेचे बाण मारले होते.

Follow Us
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?
मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला..
Maharashtra Voter List : मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला नोटीस अन्...
ठरलं तर! सीजेपीचं दिल्लीत तिरंगा मार्च, लेहरदो तिरंगा म्हणत....
CJP : ठरलं तर! सीजेपीचं दिल्लीत तिरंगा मार्च, लेहरदो तिरंगा म्हणत....
सूत्रांकडून मोठी माहिती; राहुल गांधी मुंबईत सभा घेणार?
Rahul Gandhi : सूत्रांकडून मोठी माहिती; राहुल गांधी मुंबईत सभा घेणार?
शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिली दोन पत्रं; सुळे म्हणाल्या?
Supriya Sule : शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिली दोन पत्रं; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
देशात मोठी उलथापालथ होईल, ते दोघे जाणार; राऊतांचं मोठं राजकीय भाकीत
Sanjay Raut : देशात मोठी उलथापालथ होईल, ते दोघे जाणार; संजय राऊतांचं मोठं राजकीय भाकीत, नेमकं काय म्हणाले?
यंदाचा दसरा मेळावा कसा असेल, संजय राऊतांनी सांगितलं....
Sanjay Raut on Dasara Melava : यंदाचा दसरा मेळावा कसा असेल, संजय राऊतांनी सांगितलं....