
मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर, आता महाविकास आघाडी सरकार विरोधात जोडे मारो आंदोलन करणार आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोलेंची मातोश्रीवर बैठक झाली आणि त्यानंतर रविवारी 1 सप्टेंबरला मुंबईत हुतात्मा स्मारकापासून ते गेट वे ऑफ इंडिया पर्यंत मोर्चाची घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्यावरुनही महाविकास आघाडी राजकारण करत असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत. तर शिवरायांच्या पुतळ्यातही कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला. आता पुन्हा टेंडर काढून घोटाळा करतील, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी, शिवरायांच्या पुतळा कोसळला त्यावरुन माफी मागितली आहे. तसंच दोषी अधिकारी आणि कंत्राटदारावरही कडक कारवाईचं आश्वासन दिलं. 4 डिसेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते, शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण झालं. मात्र 9 महिन्यातच महाराजांचा पुतळा कोसळला. शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट केतन पाटीलवर गुन्हा दाखल झाला. पण ते दोघेही फरार आहेत. त्यावरुन बच्चू कडूंनी पुतळ्याचं अनावरण करणाऱ्यांनी उठाबशा काढाव्यात अशी टीका केली आहे.
बदलापूरच्या अत्याचाराच्या घटनेवरुन महाविकास आघाडीनं बंदची 24 तारखेला बंदची घोषणा केली पण हायकोर्टाच्या आदेशानंतर बंद मागे घेण्यात आला. त्याऐवजी निषेध आंदोलन महाविकास आघाडीनं केला. आता पुन्हा शिवरायांच्या पुतळ्यावरुन सरकारला जाब विचारण्यासाठी महाविकास आघाडीनं 1 तारखेला जोडे मारो आंदोलन हाती घेतलं आहे.
दरम्यान आज शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राणे आणि आदित्य ठाकरेही राजकोट किल्ल्यावर आले होते. ठाकरे आणि राणे समर्थक यांच्याच आधी घोषणाबाजी झाली आणि नंतर राडा झाला. मालवणमध्ये जो राडा झाला, त्या दरम्यान खासदार नारायण राणेंचा संताप पोलिसांवरच उमटला. मध्यस्थी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांसह जयंत पाटीलही पुढे सरकारवले आणि काही वेळानंतर, अखेर पोलिसांनी नारायण राणे, निलेश राणेंसह कार्यकर्त्यांना रोखलं आणि मुख्य मार्गानंच आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना किल्ल्याच्या बाहेर काढलं.