AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CM Fadnavis :  मी फक्त टोपी फेकली, राऊतांनी दोघांच्या डोक्यात घातली... फडणवीस यांचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर

CM Fadnavis : मी फक्त टोपी फेकली, राऊतांनी दोघांच्या डोक्यात घातली… फडणवीस यांचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर

| Updated on: Jan 09, 2026 | 11:07 PM
Share

देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या युतीला भ्रष्टाचार आणि गोंधळाची युती म्हटले. त्यांच्या मते, त्यांनी केवळ टोपी फेकली होती, मात्र संजय राऊत यांनी मुलाखतीदरम्यान ती थेट उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या डोक्यावर ठेवली. राऊतांच्या या कृतीमुळे नेमके कोण भ्रष्ट आणि गोंधळलेले आहे, हे अधोरेखित झाले, असे फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपवर उपटसुंभांचा पक्ष अशी टीका करत, पक्ष वाढवण्यासाठी कुत्रे, मांजरी, उंदीर चालतात असे म्हटले आहे. सलीम कुत्ताच्या डान्स पार्टीमधील सुधाकर बडगुजर यांच्या कथित उपस्थितीवरून त्यांनी भाजपला लक्ष्य केले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या प्रकरणात अडकलेले लोक भाजपमध्ये येत आहेत. या टीकेला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या युतीला करप्शन आणि कन्फ्युजनची युती असे संबोधले. नाशिकमधील सभेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबईऐवजी नाशिकच्या नेत्यांवर टीका केल्याचे त्यांनी नमूद केले. फडणवीस म्हणाले की, त्यांनी युतीबद्दल करप्ट आणि कन्फ्युजनची युती असे म्हटले होते, मात्र कोणाचे नाव घेतले नव्हते. परंतु, एका मुलाखतीदरम्यान संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना कन्फ्युज्ड आणि उद्धव ठाकरे यांना करप्ट असे संबोधत, मी फेकलेली टोपी थेट दोघांच्या डोक्यावर घातली. फडणवीस यांनी यातून राऊतांनीच कोणाला उद्देशून टीका केली हे स्पष्ट केल्याचे म्हटले आहे.

Published on: Jan 09, 2026 11:07 PM