नागपूरकरांनी करुन दाखवलं; 130 दिवसानंतर जिल्ह्यात एकही कोरोनाबळी नाही

| Updated on: Jun 18, 2021 | 7:23 PM

कोरोनाची दुसरी लाट आली आणि नागपुरात कोरोनाने थैमान घातलं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागपुरात रोज शेकडो मृत्यूची नोंद होत होती. मात्र आता तब्बल 130 दिवसानंतर नागपुरातील कोरोना मृत्यूची साखळी तोडण्यात नागपूरकरांना यश आलंय.

नागपूरकरांनी करुन दाखवलं; 130 दिवसानंतर जिल्ह्यात एकही कोरोनाबळी नाही
nagpur corona update
Follow us on

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागपुरातील कोरोनास्थिती अत्यंत चिंताजनक आणि राज्य सरकारची डोकेदुखी वाढवणारी ठरली. नागपूर जिल्ह्यातील मृत्यूदरही राज्यात सर्वाधिक ठरला होता. मात्र आता नागपूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासांत नागपुरात एकही कोरोनाबळी गेला नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. तब्बल 130 दिवसानंतर नागपुरात दिवसभरात कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नसल्यानं नागपूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. नागपुरात गेल्या 24 तासांत 55 नव्या रुग्णांची नोंद झाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. (After 130 days in Nagpur, not a single corona died in a day)

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार नागपूर जिल्ह्यात 7 फेब्रुवारी 2021 रोजी एकही मृत्यू झाला नव्हता. त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट आली आणि नागपुरात कोरोनाने थैमान घातलं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागपुरात रोज शेकडो मृत्यूची नोंद होत होती. मात्र आता तब्बल 130 दिवसानंतर नागपुरातील कोरोना मृत्यूची साखळी तोडण्यात नागपूरकरांना यश आलंय. आज दिवसभरात नागपुरात 55 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या 1 हजार 100 वर आली आहे. तर जिल्ह्यातील रिकव्हरी रेट 97.88 टक्क्यांवर पोहोचला आहे.

नागपुरात लहान मुंलांमध्ये अँटिबॉडीज आढळल्या

राज्याची उपराजधानी नागपुरात लहान मुलांवरील कोरोना लसीची मेडिकल ट्रायल सुरू आहे. या ट्रायल दरम्यान मुलांच्या चाचण्या करण्यात आल्या, यात अनेक मुलांमध्ये अँटिबॉडी निर्माण झाल्याचे पुढे आलं आहे. ही एक दिलासादायक बाब आहे. मात्र ही ट्रायल फार कमी मुलांवर असल्याने कोणीही धोका टळला असं समजून बिनधास्त होऊ नये असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. नागपूर शहरात दोन 0 ते 18 वर्ष वयोगटातील बालकांच्या क्लिनिकल ट्रायलला सुरुवात झाली. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याची शक्यता आरोग्य तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या क्लिनिकल ट्रायल ला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

कमी मुलांची चाचणी

सुरुवातीला 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांची ट्रायल झाली त्यात 50 पैकी दहा मुलांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्याचे आढळून आलेले आहे. तर काल 6 ते 12 वर्ष वयोगटातील मुलांची ट्रायल झाली त्यात 35 पैकी 5 मुलांमध्ये अँटिबॉडी असल्याचं पुढे आलं ही बाब दिलासा देणारी असली तर यात फार कमी मुलांचा समावेश आहे. त्यामुळे कोणीही अस समजायला नको की प्रत्येक मुलांमध्ये अँटिबॉडीज निर्माण होत आहे त्यामुळे काळजी घेणे फार गरजेचे आहे, असं डॉ. वसंत खडतकर यांनी सांगितलं आहे.

संबंधित बातम्या :

चांगली बातमी ! नागपुरात 18 टक्के मुलांमध्ये अँटिबॉडीज, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी दोन हात करणे सोपे होणार ?

Nagpur Corona Update | वर्षभरानंतर नागपुरात सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद, शहरात 18, ग्रामीणमध्ये 10 नवे रुग्ण

After 130 days in Nagpur, not a single corona died in a day