नागपुरात रातोरात डाव फिरला; अभिजीत वंजारींनी अचानक घेतली आघाडी, कोहळेंना घाम फोडला, नेमकं काय घडलं?

नागपुरात रातोरात डाव फिरल्याचे दिसून आलं. नागपूर पदवीधरच्या निवडणुकीत अभिजीत वंजारींनी सुधाकर कोहळेंचा पराभव केला.

नागपुरात रातोरात डाव फिरला; अभिजीत वंजारींनी अचानक घेतली आघाडी, कोहळेंना घाम फोडला, नेमकं काय घडलं?
nagpur news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 29, 2026 | 8:00 AM

नागपूर विभाग विधानपरिषद मतदारसंघात मोठी घडामोड पाहायला मिळाली. मतमोजणीदरम्यान अभिजीत वंजारी यांनी अचानक आघाडी घेतल्याचे दिसून आले. वंजारी यांना निवडणुकीत प्रथम आणि द्वितीय पसंती क्रमांकाची एकूण 67 हजार 231 मते मिळाली आहेत. तर भाजपचे सुधाकर कोहळे यांना फक्त 63 हजार 960 मते मिळाली. निकाल जाहीर झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी विजयलक्ष्मी बिदरी यांनी अभिजीत वंजारी यांना विजयाचं प्रमाणपत्र मिळालं. या निवडणुकीत अभिजीत वंजारी यांनी 3271 इतक्या मताधिकाऱ्यांना विजय प्राप्त केला.

नागपूरच्या मानकापूरच्या विभागीय क्रीडा संकुलात मंगळवारी मतमोजणीला सुरुवात झाली. ही विधानपरिषद जवळपास 41 तास मतमोजणी चालली. यावेळी मतमोजणी केंद्रात निवडणूक निरीक्षक डॉ. हर्षदीप कांबळे, निवडणूक निर्णय अधिकारी विजयलक्ष्मी बिदरी आणि इतर नियुक्त अधिकारी होते. पहिल्या पसंतीच्या दोन फेऱ्यांमध्ये कोणात्याही उमेदवाराला विजयाचा कोटा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे दुसऱ्या पसंती क्रमांकाची बाद फेरी घेण्यात आली. पहिल्या पंसतीच्या दोन फेऱ्यांमध्ये 1 लाख  65 हजार 906 मते होती. त्यातील 15 हजार 32 मते अवैध ठरली. तसेच यातील 1 लाख 50 हजार 874 मते वैध ठरली होती. द्वितीय पसंतीच्या बाद फेऱ्यामध्ये देखील कोणत्याही उमेदवाराला निश्चित कोटा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे पहिल्या आणि द्वितीय पसंती क्रमाकांच्या फेरी मिळून अभिजीत वंजारी यांनी बाजी मारली. या निवडणुकीत 67 हजार 231 मते घेणाऱ्या अभिजीत वंजारी यांना विजयी घोषित करण्यात आलं.

Loading...

नितेश कराळे गुरूजी काय म्हणाले?

नितेश कराळे गुरूजी म्हणाले, ‘आमच्या बॅलेट पेपरवर अभिजीत वंजारी यांना जास्तीत जास्त मतदान होतं. अभिजीत वंजारींनी स्वतः श्रेय घेऊ नये. भाजपच्या विरोधात लोकांचा रोष असल्यामुळे दोन नंबरचे मते अभिजीत वंजारी यांना दिलं. भाजपने दोन नंबरचे मत मागितले नाही, हे त्यांच्यासाठी घातक ठरलं. त्यांनी दोन नंबर मागितलं असतं, तर माझ्या बॅलेटवर सारखेच दोन नंबर त्यांना असते. तर भाजपची सीट देखील येथे निवडून येण्याची शक्यता होती. हा निकाल नवीन अध्याय घेऊन महाराष्ट्रात आला आहे. तुम्ही जर एखाद्या काम करणाऱ्याची सीट डावलत असाल, तर लोक त्याला आपल्या मतदानातून प्रत्युत्तर देईल. विधानसभा लोकसभेच्या निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजे.  कराळे मास्तर कोण आहे याची आतापर्यंत दखल घेतली नाही, मात्र आता कराळे मास्तरची दखल घ्यावी लागेल.’

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us