NMC Election Results 2026 LIVE: नागपूर महापालिकेत प्रभाग क्रमांक-11 आणि प्रभाग क्रमांक -12 मध्ये कोण विजयी? निकाल एका क्लिकवर!

Nagpur Municipal Corporation NMC Election Results 2026 LIVE Updates in Marathi : 2017 साली नागपूर महानगरपालिकेवर भाजपाची सत्ता होती. बसपानेही येथे चांगली कामगिरी केली होती.

NMC Election Results 2026 LIVE: नागपूर महापालिकेत प्रभाग क्रमांक-11 आणि प्रभाग क्रमांक -12 मध्ये कोण विजयी? निकाल एका क्लिकवर!
NAGPUR MUNICIPAL CORPORATION ELECTION RESULT
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 16, 2026 | 12:56 PM

NMC Election Results 2026 LIVE : सध्या राज्यात महानगरपालिकांची निवडणूक चालू आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार आणि कोणाला दणका बसणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या निवडणुकीत नागपूर महानगपालिकेत नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस आणि भाजपाने पूर्ण जोर लावलेला आहे. नागपूर महापालिकेत प्रभाग क्रमांक 11 आणि प्रभाग क्रमांक 12 मध्ये कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नागपुरात सध्याची स्थिती काय आहे?

नागपूर महापालिकेत एकूण 38 प्रभाग आहेत. यातील 37 प्रभागात प्रत्येकी 4 उमेदवार आहेत. तर एका प्रभागात 3 उमेदवार आहेत. नागपुरात एकूण 151 जागांसाठी निवडणूक होत आहे. 2017 साली येथे भाजपाची सत्ता होती. या निवडणुकीत भाजपाने भाजप 108 जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसला फक्त 29 जागांवर विजय मिळवता आला होता. नागपुरात बसपाने मोठी कमाल केली होती. येथे बसपाचा एकूण दहा जागांवर विजय झाला होता. शिवसेनेला दोन जागांवर विजय मिळाला होतो. राष्ट्रवादीला एक आणि अपक्ष पक्षाला एक जागा मिळाली होती.

Live

Municipal Election 2026

01:50 PM

Pune Election Results 2026 : अजित पवारांना राजकारणातील सर्वात मोठा धक्का, पुण्यासह...

01:41 PM

Maharashtra Election Results 2026 : छत्रपती संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदेंना सर्वात मोठा झटका...

02:21 PM

Mumbai Election Result 2026 : मुंबईत एक उमेदवार फक्त 7 मतांनी विजयी

02:07 PM

Mumbai Election Ward No 105, 217, 39,168 Result Live 2026 : वॉर्ड क्रमांक 105, 217, 39,168 चा निकाल काय?

02:24 PM

Solapur Municipal Election Results 2026 : सोलापूरमध्ये एमआयएमने उघडलं खातं

02:09 PM

अजितदादाच्या राष्ट्रवादीचा मतमोजणीवर बहिष्कार; रुपाली पाटील ठोंबरे यांचा भाजवर गंभीर आरोप

सध्याचे जागावाटप कसे आहे?

नागपूर महानगरपालिकेत भाजपा एकूण 143 जागा लढवत आहेत. शिवसेना (शिंदे गट) पक्षाने एकूण 8 जागांवर उमेदवार उतरवले आहेत. तर अजित पवार यांची राष्ट्रवादी एकूण 96 जागा लढवत आहे. दुरीकडे काँग्रेस पक्षाने एकूण 151 जागांवर उमेदवार उतरवले आहेत. ठाकरे गटानेही 56 जागांसाठी उमेदवार दिले आहेत. शरद पवार यांची राष्ट्रवादी 79 जागा लढवत आहे. वंचित बहुजन आघाडी या पक्षानेही 75 जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. यावे मनसेनेही 22 जागा लढवण्याचे ठरवले आहे. एमआयएम पक्षाने 3 जागांवर उमेदवार उतरवले आहेत. बसपा हा पक्ष एकूण आठ जागा लढवत आहे.

2017 साली प्रभाग क्रमांक 11 मध्ये कोणाचा विजय?

प्रभाग क्रमांक 11 मध्ये एकूण चार जागा आहेत. यातील प्रभाग क्रमांक 11 अ या जागेवर भाजपाचे संदीप जाधव यांचा विजय झाला होता.. प्रभाग क्रमांक 11 मधील ब मध्ये भाजपाच्या संगिताी घिरे यांचा विजय झाला होता. त्यानंतर 11 व्या वॉर्डमधील क जागेवर भाजपाच्या अर्चना पाठक विजयी झाल्या होत्या. तर ड या जागेवरदेखील भाजपाचे भूषण शिंगणे विजयी झाले होते.

2017 साली प्रभाग क्रमांक 12 मध्ये कोणाचा विजय झाला?

प्रभाग क्रमांक 12मधील अ जागेवर काँग्रेसच्या धनश्री आव्हाड विजयी झाल्या होत्या. प्रभाग क्रमांक 12मधील ब या जागेवर भाजपाच्या माया इवनाटे विजयी झाल्या होत्या. प्रभाग क्रमांक 12मधील क जागेवर काँग्रेसचे हरिष गवळबंशी विजयी झाले होते. तर प्रभाग क्रमांक 12मधील ड या जागेवर भाजपाचे जगदीश गवळबंशी यांनी बाजी मारली होती.