Nagpur : 10 वर्षांच्या लेकीच्या शरीरावर खुणा, आईने रचलं जाळं; सावत्र बापाचं नको ते कृत्य सीसीटीव्हीत कैद

Nagpur : नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. बापानेच पोटच्या मुलीवर अत्याचार केले आहे. मुलीच्या शरीरावर खुणा दिसल्यानंतर आईने मोठं जाळं रचलं आणि बापाचा नको ते कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं... आता याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत.

Nagpur : 10 वर्षांच्या लेकीच्या शरीरावर खुणा, आईने रचलं जाळं; सावत्र बापाचं नको ते कृत्य सीसीटीव्हीत कैद
Nagpur News
| Updated on: Nov 11, 2026 | 9:44 AM

Nagpur : मुली बाहेरच नाही तर, स्वतःच्या घरात देखील सुरक्षित आहेत की नाहीत? हा प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहे. कारण आता घटनाच अशी धक्कादायक आहे. नागपुरात एकाने बापाने 10 वर्षांच्या लेकीवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आहे. लेकीच्या शारीरावर काही खुणा आढळल्यानंतर आईने मोठं जाळं रचलं आणि नराधम बापाच्या तावडीतून लेकीची सुटका केली. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलिसांना नराधम बापाला अटक केली आहे. पण घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

समोर येत असलेल्या माहितीनुसार, नागपुरात मुलीवर सावत्र वडिलांकडून वारंवार अत्याचार होत असल्याचं सत्य समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. सावत्र बापाकडून मुलीवर अत्याचार होत असल्याचं लक्षात येताच आईने सीसीटीव्ही लावून पर्दाफाश केला. नागपूरच्या पाचपावली परिसरातील ही धक्कादायक घटना आहे. 10 वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 45 वर्षीय वडिलांना अटक करण्यात आली आहे.

Loading...

मुलीच्या शरीरावर संशयास्पद खुणा दिसल्यानंतर आईला नवऱ्यावर संशय आला. अशात नवऱ्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आईने टीव्हीच्या मागे गुपचूप सीसीटीव्ही कॅमेरा बसवला. जवळपास वर्षभर घरातील हालचालींचं सीसीटीव्ही रेकॉर्डिंग सुरुच होतं. आईने मैत्रिणीच्या मोबाईलवर लाईव्ह फुटेज पाहण्याची व्यवस्था केलेली.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये सावत्र बापाकडून मुलीचे लैंगिक शोषण होत असल्याचं समोर आल्याचा दावा आईने केला. एवढंच नाही तर, आईने विचारणा केल्यानंतर मुलीने वारंवार अत्याचार झाल्याची माहिती दिली. सर्वांत संतापजनक वास्तव म्हणजे, अत्याचाराबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याने मुलगी गप्प होती.

अखेर आईच्या तक्रारीनंतर पाचपावली पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. लैंगिक अत्याचार, धमकी आणि पोक्सो कायद्यांतर्गत कारवाई करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. पोलिसांनी नराधम बापाला अटक केली असून, न्यायालयाकडून तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. आता पोलीस याप्रकरणी कसून चौकशी करत आहे. नराधम बापाची चौकशी आता पोलीस करत आहेत. यामुळे याप्रकरणी आता पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us