Nagpur Police : पेंटिग करता करता लागलं गांजाचं व्यसन, चेन स्नॅचिंग करताना सीसीटीव्हीत कैद, नागपूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

इकडं चेन स्नॅचिंगच्या घटना वाढल्या. नागपूर पोलीस सतर्क झाले. पोलिसांनी अशा घटनांवर करडी नजर ठेवली. पोलिसांनी अनेक भागातील सीसीटीव्ही चेक केले. दोन-तीन ठिकाणी एकाच प्रकारचा व्यक्ती दिसून आला.

Nagpur Police : पेंटिग करता करता लागलं गांजाचं व्यसन, चेन स्नॅचिंग करताना सीसीटीव्हीत कैद, नागपूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
| Edited By: | Updated on: Sep 06, 2022 | 4:39 PM

नागपूर : कोणाचे दिवस कसे फिरतील काही सांगता येत नाही. चांगलं काम करता करता काही लोकं वाईट मार्गाला लागतात. मग त्याचे परिणामही त्याला भोगायला लागतात. अशीच एक घटना नागपुरात घडली. कुटुंबासोबत तो पेंटिंगचे काम करायचा. मात्र त्याला गांजा पिण्याचा शौक लागला. तशा प्रकारचे त्याला मित्र मिळाले. हा गांजाचा शौक पूर्ण करण्यासाठी त्याने शक्कल लढविली. कमी वेळात कसे पैसे कमविता येतील. याचा शोध तो घेऊ लागला. मग दुचाकीवरून जाऊन चेन स्नॅचिंग (Chain snatching) करण्याचा धंदाच सुरू केला. एकदा त्याला यश आलं आणि त्याची हिंमत वाढली. त्यानंतर त्याने अशा प्रकारच्या अनेक घटनांमध्ये चोऱ्या केल्या. यामध्ये त्याला व्यसनाधीन (addicted ) लोकांची साथ मिळाली.

सीसीटीव्हीत अखेर अडकलाच

इकडं चेन स्नॅचिंगच्या घटना वाढल्या. नागपूर पोलीस सतर्क झाले. पोलिसांनी अशा घटनांवर करडी नजर ठेवली. पोलिसांनी अनेक भागातील सीसीटीव्ही चेक केले. दोन-तीन ठिकाणी एकाच प्रकारचा व्यक्ती दिसून आला. त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला. गुन्हे शाखा पोलिसांनी त्याला अटक केली. त्याने सुद्धा गुन्ह्यांची कबुली दिली. असं गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय भेंडे यांनी दिली.

समुपदेशनात सुधरणार काय?

सर्वसाधारण कुटुंबातील असलेला आरोपी मेहनत करायचा. मात्र व्यसनाच्या अधीन तो झाला. त्या प्रवाहात वाहायला लागला. आता त्याला जेलची हवा खावी लागणार आहे. पोलीस सुद्धा त्याचे समुपदेशन करतील. त्याला मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करतली. पण, काम करून खाण्याची मानसिकता राहते का, हे समोरचं कळेल. सध्या तरी त्याला जेलची हवा खावी लागणार आहे.