AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anil Dhanorkar: महिलांचा संताप, प्रकरण तापताच प्रचारासाठी आलेल्या भाजप उमेदवाराचा काढता पाय, Viral Video पाहिला का?

BJP Candidate Anil Dhanorkar: सध्या नगरपालिका, नगरपरिषदेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. आता एक डिसेंबरपर्यंत प्रचार करता येणार आहे. दरम्यान भद्रावती नगरपरिषदेत प्रचारासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला काढता पाय घ्यावा लागल्याचे पाहायला मिळाला.

Anil Dhanorkar: महिलांचा संताप, प्रकरण तापताच प्रचारासाठी आलेल्या भाजप उमेदवाराचा काढता पाय, Viral Video पाहिला का?
अनिल धानोरकर, भाजप
| Updated on: Nov 28, 2025 | 12:49 PM
Share

Anil Dhanorkar Viral Video: गेल्या १५ वर्षात भद्रावती नगरपालिकेचे राजकारण करणारे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांना जनतेने चांगलेच खडे बोल सुनावले. धानोरकर हे भद्रावती नगरपालिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवत असून, भाजपचे ते उमेदवार आहेत. खासदार प्रतिभा धानोरकर यांचे ते भासरे आहेत.धानोरकरांना नागरिकांनी परत पाठवल्याचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. वार्डातील भौतिक समस्या, घरकुल योजना व दारू या विषयावर नागरिकांनी धानोरकर यांना महिलांनी जाब विचारला. याविषयीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

महिलांच्या तीव्र रोषाचा सामना

भद्रावती नगरपरिषद निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू आहे. भाजपचे उमेदवार अनिल धानोरकर हे गवराळा गावात प्रचारासाठी आले. त्यावेळी दारू दुकानावरून स्थानिक महिलांनी त्यांना जाब विचारला. शहरासह परिसरात दारुच्या दुकानांमुळे संसार उद्धवस्त होत असल्याचे आणि कुटुंब व्यवस्थेवर परिणाम होत असल्याचा पाढा महिलांनी त्यांच्यासमोर वाचला. रात्री अनिल धानोरकर प्रचारासाठी आले होते. त्यावेळी काही महिलांनी त्यांना या दारु दुकानावरून जाब विचारला. महिलांच्या तीव्र रोषाचा त्यांना सामना करावा लागला. प्रश्नांची उत्तरे देऊ न शकल्याने त्यांना काढता पाय घ्यावा लागला. निवडणूक रंगात आली असतानाच भाजप उमेदवाराला नागरिकांनी असे पिटाळून लावल्याने स्थानिक मुद्दे किती गंभीर स्वरूपाचे आहेत, हे दिसून आले.

तुम्हीच मालक मग तक्रार कोणाकडे करायची?

दारु दुकानामुळे आमच्या घरातील आणि समाजातील तरुण बिघडत आहेत. तुम्हीच मालक असताना आम्ही कोणाकडे तक्रार करायची असा सवाल या महिलांनी धानोरकर यांना विचारला. या परिसरात धानोरकर यांचे दारुचे दुकान असल्याचा आरोप होत आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे धानोरकर चांगलेच अडचणीत आले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच त्यांनी काढता पाय घेतला.

व्हिडिओ झाला व्हायरल

चाळीस वर्षांपूर्वी लग्न करून या गावात आले. तेव्हापासून जसा वॉर्ड होता, आजही तो तसाच आहे. वॉर्डात कोणत्याच सुधारणा, विकास कामे झालेली नाही. मागील 15 वर्षात रस्ते आणि गट्टू बसवण्यात आले नाही. नाल्या, गटारी तुंबल्या आहेत, असा आरोप महिलांनी केला. याविषयीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.