Nagpur | बाबासाहेबांच्या वस्तू टिकणार 100 वर्षे, प्रयोगशाळेत केली जातेय रासायनिक प्रक्रिया

| Updated on: Dec 06, 2021 | 7:23 AM

संग्रहालयात सुमारे 350 पेक्षा जास्त वस्तूंचा समावेश आहे. आतापर्यंत 98 वस्तूंवर प्रक्रिया रासायनिक प्रक्रिया झाली आहे. या प्रक्रियेनंतर वस्तू सुमारे 100 वर्षे टिकून राहतील. नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालयातील प्रयोगशाळेत ऐतिहासिक वस्तूंवर रासायनिक प्रक्रिया केली जात आहे.

Nagpur | बाबासाहेबांच्या वस्तू टिकणार 100 वर्षे, प्रयोगशाळेत केली जातेय रासायनिक प्रक्रिया
Follow us on

नागपूर : बाबासाहेब आंबेडकर यांनी वापरलेला ऐतिहासिक कोट व इतर कपडे जतन करून ठेवण्यात येणार आहेत. त्यामध्ये संविधानाचा मसुदा टाईप करणारा टाईपरायटरचा समावेश आहे. संग्रहालयात सुमारे 350 पेक्षा जास्त वस्तूंचा समावेश आहे. आतापर्यंत 98 वस्तूंवर प्रक्रिया रासायनिक प्रक्रिया झाली आहे. या प्रक्रियेनंतर वस्तू सुमारे 100 वर्षे टिकून राहतील. नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालयातील प्रयोगशाळेत ऐतिहासिक वस्तूंवर रासायनिक प्रक्रिया केली जात आहे. नॅशनल रिसर्ज लेबारेटरी फॉर कंझर्वेशन ऑफ कल्चरल प्रापर्टीज लखनौ या केंद्र सरकारच्या संस्थेतर्फे हे काम केलं जातंय.

बाबासाहेबांनी वापरलेल्या वस्तूंचा संग्रह

कळमेश्वर रोडवरील चिचोलीत बाबासाहेबांच्या संकल्पनेतील बौद्ध केंद्र साकारण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 1957 मध्ये गोपिकाबाई ठाकरे यांनी 11 एक जागा दान दिली. या जागेवर धम्मसेनानी वामनराव गोडबोले यांनी शांतीवन उभारले आहे. त्यात बाबासाहेबांनी वापरलेले कपडे, कोट, हॅट, छत्री, पेन, कंदील या वस्तूंचा संग्रह करण्यात आलाय. या वस्तूंना वाळली लागत असल्याची बाब पुढं आली होती. शांतीवन चिचोलीतील भारतीय बौद्ध परिषदेने या वस्तूंचे जतन करण्याची मागणी शासनाकडं केली होती. त्यानंतर वस्तूंवर रासायनिक प्रक्रिया करून जतन करण्यात येत आहे.

निधीअभावी काम रखडले

सरकरानं शांतीवन चिचोलीसाठी 40 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केलाय. येथे मेडिटेशन सेंटर, वस्तूसंग्रहालय, अतिथी गृह उभारण्यात येणार आहे. परंतु, निधीअभावी हे काम अर्धवट आहे. राज्य सरकारनं उर्वरित निधी उपलब्ध करून दिल्यास तयार झालेल्या इमारती सर्वांसाठी खुल्या करता येतील, असं भारतीय बौद्ध परिषदेचे कार्यवाह संजय पाटील यांनी सांगितलं.

कोरोनामुळं दीक्षाभूमीवर निर्बंध

महापरिनिर्वाण दिन हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन आहे. तो 6 डिसेंबर रोजी आयोजित केला जातो. आंबेडकरांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) झाले होते. याच्या दुसऱ्या दिवशी 7 डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. निधनापूर्वी त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी लक्षावधी अनुयायांसह नागपुरातील दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्म स्वीकारला होता. आंबेडकर हे बौद्ध गुरू होते. यामुळं त्यांच्या पुण्यतिथीसाठी महापरिनिर्वाण हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे. दीक्षाभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी भीमसैनिक यानिमित्त येतात. परंतु, कोरोनाचे संकट असल्यानं काही निर्बंध लावण्यात आले आहेत.

Nagpur Deekshabhoomi | बाबासाहेबांच्या निर्वाणाचा सांगावा पोचवणारे दामू मोरे, महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला आठवणीला उजाळा

Nagpur Omicron | विमानानं शारजहावरून आले प्रवासी, मनपानं पाठविलं विलगीकरणात, आमदार निवासात करण्यात आली सोय