AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur DJ Ban : मुख्यमंत्र्यांच्या नागपूरात भाजपचा शहराध्यक्ष म्हणतो ‘आम्ही डीजे वाजवणारचं’

Nagpur DJ Ban : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा गणेशोत्सव सांस्कृतिक पद्धतीने उत्सव साजरा झाला पाहिजे अशी भूमिका मांडली आहे. पण त्यांच्याच नागपूरमधील भाजप शहराध्यक्षाने 'आम्ही डीजे वाजवणारचं'अशी भूमिका घेतली आहे.

Nagpur DJ Ban : मुख्यमंत्र्यांच्या नागपूरात भाजपचा शहराध्यक्ष म्हणतो 'आम्ही डीजे वाजवणारचं'
Nagpur DJ
| Updated on: Sep 04, 2026 | 11:20 AM
Share

महाराष्ट्रात गणेशोत्सवात डीजे वाजवण्याचा मुद्दा तापत चालला आहे. त्यावरुन आता राजकारण सुरु झालं आहे. काल विद्यानंद बापट यांना पुण्यात मारहाण झाली. त्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. बापटांना झालेल्या मारहाणीनंतर पुण्यात रविवारी डीजे बंदीसाठी मोर्चा निघणार आहे. सोलापुरात पोलिसांनी डीजे वाजवण्यावर बंदी घातली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांस्कृतिक पद्धतीने उत्सव साजरा झाला पाहिजे अशी भूमिका मांडली आहे. पण नागपूरात मात्र भाजप नेत्याने वेगळी भूमिका घेतली आहे. नागपूर भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी आम्ही डीजे वाजवणारचं असं म्हटलं आहे. श्रीकृष्णाप्रमाणेच अन्यायाविरोधात लढा असं दयाशंकर तिवारी म्हणाले.

“संपूर्ण महाराष्ट्रात कायदा एकसारखा असला पाहिजे. मुंबई, पुणे, नागपूरला वेगळा कायदा असं नको. यापूर्वीही नागपूरच्या पोलीस आयुक्तांनी निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्त मुद्दाम गणेशोत्सव, दुर्गोत्सव आणि आता कृष्ण जन्माष्टमी यावेळी डीजेवर बंदी घालतात” असं दयाशंकर तिवारी म्हणाले. तुम्हाला भाजपमध्ये अंतर्गत मतभेद वाटत नाहीत का? “कोणाचा वयैक्तीक विचार सामाजिक विषयावर असणं अपेक्षित आहे. संदीप जोशींचा जो विचार आहे, तो व्यक्तिगत विचार आहे. भाजपचा विचार नाही. मुंबईत डीजे आहे, पुण्यात डीजे आहे, महाराष्ट्रात डीजे आहे, मग नागपुरात का नाही?” असा प्रश्न दयाशंकर तिवारी यांनी विचारला.

तुम्ही कोर्टात जाणार का?

तुम्ही कोर्टात जाणार का? “थेट कोर्टात जाणार नाही. पोलीस आयुक्तांसोबत आधी बोलणार. कारण त्यांनी आदेश काढलाय. ज्यांनी निर्णय काढलाय, त्यांच्याशी आधी बोललं पाहिजे. काही नाही झालं तर मग पुढे जाऊ” असं दयाशंकर तिवारी स्पष्टपणे बोलले. “आम्ही डीजे वाजवणारचं. पोलिसांनी गुन्हा दाखल केला तर तो स्वीकारणार. डीजे वाजवण्यात काही अडचण नाही. फक्त मर्यादीत आवाजात वाजला पाहिजे” असं दयाशंकर तिवारी म्हणाले. गणेशोत्सवात खासकरुन विसर्जन मिरवणुकीच्यावेळी डीजे लावला जातो. यावेळी मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होतं. ज्याचा लहान मुलं, वुद्धांना त्रास होतो. त्यामुळे राज्याच्या अनेक भागातून डीजेवर बंदी घालावी अशी मागणी होत आहे.

Follow Us
मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? बापटांवरील हल्ल्यावर पवारांचा संताप
Sharad Pawar | मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर शरद पवारांचा संताप; हा लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवर हल्ला
मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई...
CM Fadnavis | मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार; तिसऱ्या मुंबईचेही संकेत
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी